सौदीमध्ये दिसली पहिला महिला कार चोर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:03 PM2018-08-29T23:03:51+5:302018-08-29T23:04:39+5:30
महिलांना कार चालविण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेथील महिला मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत. मात्र, महिलांनी कार चोरण्यासही सुरुवात केल्याने सौदीच्या प्रशासनाल धक्का बसला आहे.
रियाध : सौदी अरबमध्ये महिलांनाकार चालविण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेथील महिला मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत. मात्र, महिलांनी कार चोरण्यासही सुरुवात केल्याने सौदीच्या प्रशासनाल धक्का बसला आहे. एक महिला कार चोरतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
فيديو🔴
— أخبار عاجلة (@News_Brk24) August 27, 2018
.
.
فتاة تسرق سيارة من أمام أحد المحلات التجارية في #الدمام، بعد أن تركها صاحبها في وضع التشغيل.
.
.#السعوديةpic.twitter.com/FBFyXH84LJ
सौदीमधील अल दमाममध्ये एका कार चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये दिसला. यामध्ये ही महिला कारचा दरवाजा खोलण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आपली लाल रंगाची कार पार्क करून जात आहे. यानंतर काही वेळाने एक महिला पांढऱ्या कारमधून उतरून ती लाल कार घेऊन पसार होत आहे. सौदीमधील लोक या महिलेला पहिली कार चोर म्हणून हीनवत आहेत.