Danish Siddiqui: तालिबानींनी दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले होते; अफगाण लष्कराचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 10:06 AM2021-08-02T10:06:45+5:302021-08-02T10:10:21+5:30
Danish Siddiqui: तालिबानींनी दानिश सिद्दीकीला प्रथम जिवंत पकडले होते, त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली, असे शेनवारी यांनी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली: पुलित्झर पुरस्कार विजेते फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांच्या मृत्यूबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. तालिबानींनी दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले होते, अशी माहिती अफगाणिस्तानच्या नॅशनल डिफेंस अँड सेक्युरिटी फोर्सचे प्रवक्ते अजमल उमर शेनवारी यांनी दिली. तालिबानींनी दानिश सिद्दीकीला प्रथम जिवंत पकडले होते, त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली, असे शेनवारी यांनी स्पष्ट केले आहे. (first official confirmation by ajmal shinwari that taliban assassinated danish siddiqui)
तालिबानींनी दानिश सिद्दीकीला आधी जिवंत पकडले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दानिश यांची हत्या तालिबानच्या कब्जात असलेल्या कोणत्या भागात करण्यात आली, याबाबत माहिती मिळण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. तसेच या घटनेच्या साक्षीदारांपर्यंत पोहोचणे सर्वांत कठीण पण महत्त्वाचे आहे. दानिश यांची हत्या कशाप्रकारे करण्यात आली असावी, याबाबत अधिक तपास सुरू आहे, असे अजमल उमर शेनवारी यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबान आणि अफगाण लष्करातील संघर्ष सुरूच
पाकिस्तानकडून तालिबानला मोठी मदत
पाकिस्तानकडून तालिबानी दहशतवाद्यांना मोठी मदत आणि रसद पुरवली जात आहे. तसेच पाकिस्तानकडून तालिबानचे समर्थनही करण्यात येत आहे. हे एक प्रकारचे छद्म युद्ध असून, अफगाणिस्तान सरकार याच्याशी निकराने, जिद्दीने लढत आहे. आयएस, अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनाही अफगाणिस्तानमध्ये सक्रीय आहेत. एवढेच नव्हे तर आणखी दहशतवादी पाकिस्तानमधून येत आहेत, असेही शेनवारी यांनी स्पष्ट केले.
“येत्या दशकात भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, विकास अधिक गतिमान होईल”
अन्य देशांकडून मदतीची अपेक्षा
तालिबानविरोधात अफगाणिस्तानने अन्य देशांकडून मदत मागितली आहे. ते अन्य देशांच्याही हिताचे ठरेल. त्यामुळे अफगाणिस्तान सैन्याला मदत आणि पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा शेनवारी यांनी व्यक्त केली. दरम्यान, आतापर्यंत दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान झाल्याचे बोलले जात होते. दानिश यांच्या डेथ सर्टिफिकेटमध्येही गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. दानिश सिद्दीकी यांना फक्त गोळीच मारण्यात आली नाही, तर तालिबानच्या दहशतवाद्यांनी त्यांचे डोके कारखाली चिरडल्याचे सांगण्यात आले होते.
भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा
तत्पूर्वी, दानिश सिद्दीकी यांची आम्ही हत्या केलेली नाही, असा दावा तालिबानींकडून करण्यात आला होता. तालिबानचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, युद्धभूमीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने आम्हाला त्यांची माहिती द्यावी. पाकिस्तानच्या सीमेलगत अफगाणी सैनिकांशी तालिबान्यांची जी चकमक झाली, त्याचे वृत्तांकन करताना दानिश सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. अफगाणिस्तानच्या लष्करी सूत्रांनी सांगितले की, तालिबानींनी स्पिन बोलदाक येथील मुख्य बाजारपेठेचा भाग ताब्यात घेतला आहे, तो त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी संघर्ष सुरू होता.