175 वर्षापूर्वी घेतली गेली होती पहिली सेल्फी
By Admin | Published: November 9, 2014 02:30 AM2014-11-09T02:30:42+5:302014-11-09T02:30:42+5:30
सध्या सर्वानाच सेल्फीने झपाटून टाकले आहे. मात्र, सेल्फीची सुरुवात केव्हा झाली हे तुम्हाला माहीत आहे का? 1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस याने जगातील पहिली सेल्फी घेतली होती.
न्यूयॉर्क : सध्या सर्वानाच सेल्फीने झपाटून टाकले आहे. मात्र, सेल्फीची सुरुवात केव्हा झाली हे तुम्हाला माहीत आहे का? 1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस याने जगातील पहिली सेल्फी घेतली होती. रॉबर्ट तेव्हा 3क् वर्षाचा होता. अमेरिकेतील पेन्सिलव्हेनियाचा रहिवासी असलेल्या कॉर्नेलियसने फिलाडेल्फियातील आपल्या पित्याच्या दुकानामागे हे छायाचित्र घेतले होते. कॉर्नेलियसने छायाचित्रणाचे प्रशिक्षण आणि कौशल्य प्राप्त केल्यानंतर 2क् वर्षे पित्याच्या दुकानात काम केले होते. त्यांच्या फोटोग्राफी कंपनीचा अमेरिकेतील सर्वात मोठय़ा फोटोग्राफी कंपन्यांत समावेश होत होता. कॉर्नेलियसचे 1893 मध्ये निधन झाले होते. (वृत्तसंस्था)