व्हाईट हाऊसमध्ये तृतीयपंथीची प्रथमच नेमणूक
By admin | Published: August 19, 2015 11:02 PM2015-08-19T23:02:43+5:302015-08-19T23:02:43+5:30
समलैंगिक व्यक्तींना विवाहाचा अधिकार दिल्यानंतर अमेरिकेने आता लैंगिक अल्पसंख्यकांना समानतेची वागणूक देण्याच्या दिशेने आणकी एक पाऊल टाकत
वॉशिंग्टन : समलैंगिक व्यक्तींना विवाहाचा अधिकार दिल्यानंतर अमेरिकेने आता लैंगिक अल्पसंख्यकांना समानतेची वागणूक देण्याच्या दिशेने आणकी एक पाऊल टाकत एका तृतीयपंथी व्यक्तीची व्हाईट हाऊसमध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक केली आहे. राफी फ्रीडमन-गुर्स्पान असे त्यांचे नाव आहे.
नॅशनल सेंटर फॉर ट्रान्सजेंडर इक्वालिटी येथे सल्लागार म्हणून काम करणाऱ्या राफी आता व्हाईट हाऊसच्या कार्यालयामध्ये भरती विभागामध्ये काम करतील. राफी यांच्या नेमणुकीनंतर व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ सल्लागारपदी काम करणाऱ्या वेलेरी जेरेट म्हणाल्या, राफीच्या नेमणुकीमुळे प्रशासन आणि नेतृत्व कसे आहे याची प्रचीती येते आणि यामुळे तृतीयपंथी विशेषत: दारिद्र्यावस्थेत असणाऱ्या तृतीयपंथीयांच्या विकासासाठी मदत होणार आहे. बराक ओबामा यांनी पूर्वी एलजीबीटींच्या हक्कांना विरोध दशर्विला होता मात्र २०१२ मध्ये त्यांनी भूमिका बदलत एलजीबीटींच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन लष्करात काम करणाऱ्या समलैंगिक व्यक्तींच्या बाबतीत असणारी डोंट आस्क, डोंट टेल ही पद्धतीही ओबामा यांनी ंसंपवली. त्यामुळे ओबामा प्रशासनाच्या कार्यकाळात एलजीबीटी समुदायाला महत्त्वाचे अधिकार मिळाले आहेत. राफीच्या नेमणुकीनंतर अमेरिकेत ट्रान्सजेंडर्सनाही समान व जगण्याचे किमान अधिकार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होतील असे संकेत मिळत आहेत. (वृत्तसंस्था)