हॉटलाईनद्वारे प्रथमच मोदी- ओबामा चर्चा

By admin | Published: November 12, 2015 12:02 AM2015-11-12T00:02:42+5:302015-11-12T00:02:42+5:30

भारत आणि अमेरिका यांच्यात स्थापन करण्यात आलेल्या हॉटलाईनद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रथमच संवाद साधला आणि उभय देशांतील संबंधाचा आढावा घेतला.

First time Modi-Obama discussions through hotline | हॉटलाईनद्वारे प्रथमच मोदी- ओबामा चर्चा

हॉटलाईनद्वारे प्रथमच मोदी- ओबामा चर्चा

Next

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यात स्थापन करण्यात आलेल्या हॉटलाईनद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रथमच संवाद साधला आणि उभय देशांतील संबंधाचा आढावा घेतला.
लवकरच जी-२० देशांची बैठक होणार आहे. या दोन्ही मुद्यांवर उभयतांनी चर्चा केल्याचे व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आले. अध्यक्ष ओबामा यांनी द्विपक्षीय सहकार्यातील प्रमुख क्षेत्रातील संयुक्त प्रयत्नांचा आढावा घेताना जी-२० शिखर परिसर, पूर्व आशिया शिखर परिषद, पॅरिस हवामानबदल परिषद आदी अनेक जागतिक मुद्यांवर पंतप्रधान मोदींशी हॉटलाईनवरून चर्चा केली. (वृत्तसंस्था)
 

Web Title: First time Modi-Obama discussions through hotline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.