लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड

By admin | Published: May 7, 2016 07:54 AM2016-05-07T07:54:04+5:302016-05-07T08:34:44+5:30

लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड झाली आहे. सादिक खान यांच्या रुपात पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्ती महापौर झाली आहे.

First time Muslim candidate for the post of Mayor of London | लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड

लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड

Next
>ऑनलाइन लोकमत 
लंडन, दि. ७ - लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड झाली आहे. सादिक खान यांच्या रुपात पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्ती महापौर झाली आहे. पाकिस्तानी वंशाचे असलेले सादीक खान यांनी लेबर पक्षाच्या तिकीटावर लंडनच्या महापौरपदाची निवडणूक लढवली होती.  इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये महापौर, विधिमंडळ आणि संसदीय निवडणुकांसाठी झालेल्या मतदानात त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटीव्ह पक्षाचे उमेदवार झॅक गोल्डस्मिथ यांचा दारुण पराभव केला.
 
कंझर्व्हेटीव्ह यांनी हिंदू आणि शिख मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर केला होता हे विशेष. लंडनच्या महापौरपदाची लढाई सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाते. माजी मानवाधिकार कार्यकर्ते आणि २००५ पासून लेबर पक्षाचे खासदार असणारे सादीक खान (४५) यांनी यंदाच्या निवडणुकीत बाजी मारती आहे. 
 
सादीक खान यांचे वडील बस चालक होते. खान यांनी ही निवडणूक जिंकल्यामुळे युरोपातील सर्वात प्रभावशाली मुस्लिम नेतृत्व म्हणून त्यांचा उदय होईल असा कयास व्यक्त होत आहे. माजी पंतप्रधान गॉरडन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते. कॅबिनेट बैठकीतील ते पहिले मुस्लिम मंत्री होते. सॉलिसिटर सादीया अहमदबरोबर त्यांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुली आहेत. स्वत:चा उल्लेख करताना त्यांनी मी युरोपियन, ब्रिटीश, इंग्लिशमन लंडनर आहे असे त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. १९४७ फाळणी झाल्यानंतर सादीक खान यांचे आजी-आजोबा भारतातून पाकिस्तानात गेले. सादीक खान यांचा जन्म होण्याआधी त्यांचे माता-पिता इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले होते.  
 

Web Title: First time Muslim candidate for the post of Mayor of London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.