पाकमध्ये पहिली महिला मुख्यमंत्री; नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:04 AM2024-02-27T10:04:37+5:302024-02-27T10:04:52+5:30
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थित सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (एसआयसी) च्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वॉकआउट केल्याने मरियम (५०) यांनी मुख्यमंत्रिपदाची निवडणूक जिंकली.
लाहोर : पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) च्या वरिष्ठ नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज सोमवारी पंजाब प्रांताच्या या पदावर निवडून आलेल्या देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थित सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (एसआयसी) च्या
निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वॉकआउट केल्याने मरियम (५०) यांनी मुख्यमंत्रिपदाची निवडणूक जिंकली.
मरियम म्हणाल्या की, वडील ज्या पदावर बसायचे त्या पदावर बसून मला आनंद होतोय. महिला मुख्यमंत्री झाल्याने लोकांना अभिमान वाटतोय.
राजकीयदृष्ट्या महत्त्व वाढणार
मरियम यांना २२० मते मिळाली आहेत. पीटीआय-समर्थित सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (एसआयसी) च्या राणा आफताबचा पराभव करून मरियम राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री बनल्या. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची लोकसंख्या १२ कोटी आहे.
पण मी बदला घेणार नाही
nतुरुंगात जाण्यासारख्या कठीण प्रसंगांचा मी सामना केला आहे, परंतु मला मजबूत बनवल्याबद्दल मी माझ्या विरोधकांची आभारी आहे.
nमात्र, मी याचा बदला घेणार नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसार यांचा उल्लेख केला.