ब्रिटनच्या संसदीय समितीत पहिल्या महिला शिख खासदाराची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 07:53 PM2017-07-18T19:53:11+5:302017-07-18T19:53:11+5:30
ब्रिटनच्या संसदीय निवड समितीमध्ये पहिल्यांदाच एका महिला शिख खासदाराची वर्णी लागली आहे. प्रीत कौर गिल यांची या समितीमध्ये
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - ब्रिटनच्या संसदीय निवड समितीमध्ये पहिल्यांदाच एका महिला शिख खासदाराची वर्णी लागली आहे. प्रीत कौर गिल यांची या समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये 11 जणांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणं हे या समितीचं मुख्य काम आहे.
प्रीत कौर या लेबर पार्टीच्या खासदार आहेत. 2017 मध्ये बर्मिंघम एबेस्टन येथून त्यांनी निवडणूक जिंकली होती. यापुर्वी सप्टेंबर 2016 पर्यंत लेबर पार्टीच्या केथ वेज ह्या या समितीमध्ये होत्या मात्र ड्रग्स आणि वेश्यावृत्तीच्या आरोपांमुळे त्यांना समितीमधून बाहेर पडावं लागलं होतं. गेले 9 वर्ष केथ वेज ह्या या समितीच्या अध्यक्षा होत्या.
समितीमध्ये निवड झाल्याने अत्यंत आनंदी आहे, लहान मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराकडे माझं विशेष लक्ष असणार आहे असं कौर म्हणाल्या. कौर यांनी दिल्लीमध्ये बेघर मुलांच्या विकासासाठीही कामं केली आहेत. घरगुती हिंसेवरही लक्ष देणार असल्याचं 44 वर्षाच्या प्रित कौर म्हणाल्या.