किनारपट्टीवरील पाच कोटी लोकांचे जीवन धोक्यात?

By admin | Published: November 9, 2015 10:55 PM2015-11-09T22:55:25+5:302015-11-09T22:55:25+5:30

हवामानातील बदलामुळे मुंबईसह भारतीय किनारपट्टीवरील साडेपाच कोटी लोकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता असून तापमान चार अंश सेल्सियसवर गेल्यास समुद्राची

Five billion people in the coastal life risk? | किनारपट्टीवरील पाच कोटी लोकांचे जीवन धोक्यात?

किनारपट्टीवरील पाच कोटी लोकांचे जीवन धोक्यात?

Next

वॉशिंग्टन : हवामानातील बदलामुळे मुंबईसह भारतीय किनारपट्टीवरील साडेपाच कोटी लोकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता असून तापमान चार अंश सेल्सियसवर गेल्यास समुद्राची पातळी वाढून जगभरातील अर्धा अब्जावधी लोकांच्या वस्त्या बुडण्याची शक्यता आहे, असा गंभीर इशारा अमेरिकेतील क्लायमेट सेंट्रल या संस्थेने दिला आहे.
३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबरदरम्यान पॅरिस येथे होत असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल या विषयावरील परिषदेच्या काही आठवड्यांपूर्वीच या संस्थेने हा निष्कर्ष काढला आहे. पृथ्वीवरील तापमान दोन अंश सेल्सियसवर आणणे, हा या परिषदेचा उद्देश आहे. तथापि, हे उद्दिष्ट साध्य करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. वाढत्या तापमानामुळे समुद्राची पातळी वाढून शांघाय आणि शांतौ (चीन), हावडा आणि मुंबई, तसेच हनोई आणि बांगलादेशातील खुल्ना किनारपट्टीवरील जनजीवन धोक्यात येऊ शकते, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले.
जागतिक तापमान दोन अंश सेल्सियसवर आणल्यास हा धोका बव्हंशी कमी होऊ शकतो. जागतिक तापमान दोन अंश सेल्सियसने वाढल्यास भारतातील २० दशलक्ष लोकांची, तर चीनमधील ६४ दशलक्ष लोकांची घरे बुडण्याची शक्यता आहे.

Web Title: Five billion people in the coastal life risk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.