चिमुरडीच्या अवयवदानाने पाच रुग्णांचे वाचले प्राण!
By admin | Published: September 30, 2014 01:04 AM2014-09-30T01:04:05+5:302014-09-30T01:04:05+5:30
मेंदूच्या कर्करोगाने मृत्यू पावलेल्या चीनमधील एका तीन वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी तिच्या अवयवांचे दान केल्याने त्या अवयवांचे प्रत्यारोपण करून अन्य पाच रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
Next
>बिजिंग : मेंदूच्या कर्करोगाने मृत्यू पावलेल्या चीनमधील एका तीन वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी तिच्या अवयवांचे दान केल्याने त्या अवयवांचे प्रत्यारोपण करून अन्य पाच रुग्णांचे प्राण वाचले आहेत. दुर्दैवाने या मुलीच्या नशिबी जेमतेम तीन वर्षाचे आयुष्य आले, पण या महादानाने तिच्या या चिमुकल्या जीवनाचेही सार्थक झाले.
चीनच्या सिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार तीन वर्षाच्या लिवु जिनग्याओचे हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंडे व दोन्ही डोळ्य़ांच्या नेत्रपटलांचे दान करून त्यांचे पाच गरजू रुणांवर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
लिवु काही फार दिवसांची सोबती नाही, हे स्पष्ट झाल्यावरतिचे वडील लिवु जियाओबाओ यांनी तिच्या अवयवांचे दान करण्याच्या शक्यतांवर विचार करण्यास सुरुवात केली. जियाओबाओ यांनी सांगितले, ‘अवयवदान’ म्हणजे नेमके काय, हे समजण्याचे तिचे वय नव्हते. त्यामुळे मी तिला असे समजावून सांगितले की, तुङया शरीरातील काही गोष्टी आपण इतरांना दिल्या तर त्यांचे प्राण वाचू शकतील. हे ऐकून तिनेही आनंदाने होकार दिला. (वृत्तसंस्था)