इस्रायलच्या हल्ल्यात 5 पॅलेस्टिनी ठार
By admin | Published: August 10, 2014 03:10 AM2014-08-10T03:10:09+5:302014-08-10T03:10:09+5:30
तीन दिवसांची युद्धबंदी संपताच इस्रायलने शनिवारी गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवर रॉकेटस्नी हल्ला केला. त्यात पाच पॅलेस्टिनी ठार झाले.
Next
>गाझा/जेरूसलेम : तीन दिवसांची युद्धबंदी संपताच इस्रायलने शनिवारी गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवर रॉकेटस्नी हल्ला केला. त्यात पाच पॅलेस्टिनी ठार झाले. महिनाभरापासून इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या हल्ला-प्रतिहल्ल्यांत आतार्पयत 2क्क्क् लोकांचा बळी गेला असून हा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे.
शनिवारी भल्या पहाटे आम्ही हमासच्या किमान 33 ठिकाणांवर हल्ले केले, तर दक्षिण इस्रायलमध्ये हमासने पाच रॉकेटने हल्ला केला, असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले. ठार झालेल्या पाच पॅलेस्टिनींपैकी तिघांचे मृतदेह उद्ध्वस्त झालेल्या मशिदीतून बाहेर काढण्यात आले आहेत.
जुलैच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या संघर्षात 196क् पेक्षा जास्त लोक ठार झाले असून त्यातील 19क्क् पेक्षा जास्त हे पॅलेस्टिनी व नागरी वसाहतीतील आहेत. यात 67 इस्रायलीही ठार झाले आहेत. (वृत्तसंस्था)
4कैरो : गाझापट्टीत ताबडतोब युद्धबंदी व्हावी, असे आवाहन इजिप्तने केले असून त्या दिशेने होत असलेल्या चर्चेत इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा सहभाग आहे, असे म्हटले.
4गाझापट्टीत शनिवारी इस्रायलने अनेक हवाई हल्ले केले. गाझातून ‘अल जझीरा’चे प्रतिनिधी अँड्रय़ू सीमन्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार युद्धबंदी करारासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी आमची दारे अजून बंद झालेली नाहीत, असे म्हटले आहे.
4पॅलेस्टाईनचे काही नेते कैरोमध्ये असून येत्या काही तासांत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. दुजोरा न मिळालेल्या वृत्तानुसार काही इस्रायली अधिकारी सध्या चर्चा करीत आहेत.