इंडोनेशियातील भूकंपात पाच हजार लोक बेपत्ता; मदतकार्य मंदगतीने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:03 AM2018-10-08T00:03:35+5:302018-10-08T00:05:28+5:30

भूकंपाचा जोरदार धक्का व त्यापाठोपाठ आलेली त्सुनामी यांचा तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये आतापर्यंत १७६३ जणांचे मृतदेह हाती लागले असून, सुमारे ५ हजार माणसे अद्यापही बेपत्ता आहेत. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे या देशातील मदतकार्याला अनेक मर्यादा येत आहेत.

Five thousand people missing in Indonesia earthquake; Hedges start slowing down | इंडोनेशियातील भूकंपात पाच हजार लोक बेपत्ता; मदतकार्य मंदगतीने सुरू

इंडोनेशियातील भूकंपात पाच हजार लोक बेपत्ता; मदतकार्य मंदगतीने सुरू

googlenewsNext

जकार्ता : भूकंपाचा जोरदार धक्का व त्यापाठोपाठ आलेली त्सुनामी यांचा तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये आतापर्यंत १७६३ जणांचे मृतदेह हाती लागले असून, सुमारे ५ हजार माणसे अद्यापही बेपत्ता आहेत. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे या देशातील मदतकार्याला अनेक मर्यादा येत आहेत.
सुलावेसी बेट परिसरात २८ सप्टेंबर रोजी ७.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला व त्सुनामीचेही संकट ओढावले. याचा मोठा फटका पालू-पेटोबो व बालारोआ या दोन भागांना बसला. तेथील इमारती कोसळून त्याच्या ढिगाºयाखाली कित्येक लोक दबले गेले. त्यातील अनेकांची बचावपथकांनी सुखरूप सुटका केली; परंतु तरीही अद्याप पाच हजार जण बेपत्ता आहेत.
राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी सांगितले की, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाºयांखाली अद्यापही अडकून पडलेल्यांचा शोध घेण्यासाठी११ आॅक्टोबरपर्यंत मोहीम राबविण्यात येईल. त्यात ज्या व्यक्तींचा शोध लागणार नाही त्यांना बेपत्ता किंवा मृत म्हणून जाहीर केले जाईल. पालू येथील पेटोबो या गावामध्ये भूकंप-त्सुनामीने खूपच नुकसान झाले आहे.

२ लाख भूकंपग्रस्त अडचणीत
इंडोनेशियातील २ लाख भूकंपग्रस्त विलक्षण अडचणीत असून, त्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्य करावे, असे आवाहन त्या देशाने नुकतेच केले होते. भारताने ‘आॅपरेशन समुद्र मैत्री’ या नावाने इंडोनेशियात मदतमोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत भारतीय वैद्यकीय पथके तिथे रवाना झाली व पुनर्वसनासाठी आवश्यक वस्तू लष्करी हेलिकॉप्टर, विमानाद्वारे त्या देशात पाठविण्यात आल्या.

Web Title: Five thousand people missing in Indonesia earthquake; Hedges start slowing down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.