Flashback 2020 : कुणी फिटनेस दाखवत तर कुणी खावून रचला इतिहास; हे आहेत 2020मधील खास गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड
By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 24, 2020 04:16 PM2020-12-24T16:16:39+5:302020-12-24T16:20:03+5:30
कोरोना महामारीमुळे हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले. संपूर्ण जगालाच कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मात्र, याकाळात अनेकांनी नव-नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डदेखील प्रस्थापित केले आहेत. एक नजर अशाच काही खास रेकॉर्ड्सवर...
जसजसे नवीन वर्ष 2021 जवळ येत आहे. तसतसे अनेक जन 2020 या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोना महामारीमुळे हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले. संपूर्ण जगालाच कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मात्र, याकाळात अनेकांनी नव-नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डदेखील प्रस्थापित केले आहेत. यात स्टेक घालून 30 सेकंदात सर्वाधिक स्किपिंग करण्यापासून ते तीन मिनिटांत सर्वाधिक जाम डोनट्स खान्यापर्यंतच्या रेकॉर्ड्सचा समावेश आहे. एक नजर अशाच काही खास रेकॉर्ड्सवर...
1. जगातील सर्वात लांब केस असलेली मुलगी -
निलांशी पटेल ही जगातील सर्वात लांब केस असलेली किशोरवयीन मुलगी ठरली आहे. तिच्या केसांची लांबी दोन मिटर, म्हणजेच 6 फूट 6.7 इंच एवढी आहे. निलांशी पटेलने स्वतःच स्वत:चा विक्रम (रेकॉर्ड) मोडण्याची ही तिसरी वेळ आहे.
2. रोलर / इनलाईन स्केट्स घालून 30 सेकंदात सर्वाधिक स्किप्स -
हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जोरावर सिंग यांनी नोंदवला आहे त्यांनी रोलर / इनलाईन स्केट्स घालून 30 सेकंदांत 147 स्किप्स केले. जोरावर पूर्वी हायस्कूलमध्ये एक डिस्कस थ्रोअर होते. मात्र गंभीर दुखापतीनंतर त्यांनी या स्पोर्ट प्रकाराला राम राम केला आणि नंतर आपला फिटनेस चांगला करण्यासाठी त्यांनी स्किपिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी जंप रोप वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये भाग घेतला होता आणि नंतर त्यांनी या क्षेत्रातील बेस्ट होण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किताब मिळविण्याचे ठरवले होते.
3. एका मिनिटात सर्वाधिक क्ले टार्गेट पंचेस -
एका मिनिटात सर्वाधिक क्ले टार्गेट पंचेसचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मुहम्मद रशीदच्या नावावर आहे. त्याने एका मिनिटात 62 पंच मारले. रशीदच्या नावावर अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. यात हाताने एका मिनिटात सर्वाधिक आक्रोड तोडण्याचा रेकॉर्डदेखील आहे.
4. जगातील सर्वाधिक उंची असलेला किशोरवयीन मुलगा -
हा रेकॉर्ड 14 वर्षीय रेन केयु (Ren Keyu)च्या नावावर आहे. त्याची उंची 221.03 cm किंवा 7 फूट 3.02 इंच एवढी आहे. बालकमंदिरात असताना त्याची उंची तब्बल 150 सेंटीमिटर होती.
5. तीन मिनिटांत सर्वाधिक जाम डोनट्स खाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड -
हा विक्रम लेआ शटकेव्हर (Leah Shutkever)च्या नावे आहे. ती मुळची युकेतील बर्मिंघमची आहे. तीने केवळ तीन मिनिटांत 10 जॅम डोनट खान्याचा गिनीज वर्ल्ड रोकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शटकेव्हरने या चॅलेन्जदरम्यान ओठ एकदाही न चाटता हे सर्व डोनट्स खालले होते.