संकटं संपता संपेना! 'हा' छोटासा किडा करू शकतो जगाचा विनाश?; शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 03:19 PM2022-02-03T15:19:49+5:302022-02-03T15:20:59+5:30

किड्यांच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या किड्यांची शक्ती खूपच घातक आहे.

flatworm is new killer species heading in gardens and forms | संकटं संपता संपेना! 'हा' छोटासा किडा करू शकतो जगाचा विनाश?; शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

संकटं संपता संपेना! 'हा' छोटासा किडा करू शकतो जगाचा विनाश?; शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

googlenewsNext

एक संकट संपत नाही तोच दुसरं संकट येऊन उभं ठाकतं. शास्त्रज्ञांसमोर रोज नवनवीन आव्हानं येत आहेत. जग सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोना हे मोठ्या विनाशाचं कारण ठरलं. प्रत्येकालाच या संकटाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा असंच एक संकट येऊ घातलं आहे. जे माणसाच्या शरीराला सध्यातरी थेट काही नुकसान पोहचवणार नाही. पण अशा परिस्थितीला जन्म देऊ शकतं, ज्याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडू शकतो.

शास्त्रज्ञांनुसार किड्यांच्या दोन नव्या प्रजातींचा (Two new species of killer hammerhead flatworms) शोध लागला आहे. या किड्यांची शक्ती खूपच घातक आहे. हे किडे सध्यातरी बागांमध्ये आढळले आहेत. पण लवकरच या समस्येवर उपाय न शोधल्यास आपल्या किचनपर्यंत पोहचून आपल्या आयुष्यावरही हे किडे विपरित परिणाम करू शकतात. या किड्यांचा शोध लागण्यानंतर काही दिवसांतच ते अन्य 3 देशांमध्ये सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

10 पेक्षा जास्त प्रजाती आशियामधून पसरताहेत जगभरात 

फ्लॅटवर्म (Flatworm) असं या नव्या संकटाचं नाव आहे. ज्याची लांबी फक्त 3 सेमी एवढी आहे. पण याच्या सर्वांत मोठ्या प्रजातीतील किड्याची लांबी जवळपास 3 फूटांपर्यंत असू शकते. आत्ता फ्लॅटवर्म ब्रिटीश बागांमध्ये आढळले आहेत. पण शास्त्रज्ञांना शंका आहे की, हे जर वेगाने पसरले तर जैव विविधतेसाठी (Biodiversity of British gardens) धोका ठरू शकतात. रोपांच्या आयात-निर्यातीत वर्मच्या 10 पेक्षा जास्त प्रजाती आशियामधून जगभरात फैलावत आहेत. फ्लॅटवर्मच्या नव्या प्रजाती फ्रान्स, इटली (France and Italy) आणि आफ्रिकेच्या बेटांवरही (Island near Africa) आढळल्या आहेत. गांडूळ आणि गोगलगाय या किड्यांचा प्रमुख आहार आहेत. आत्तापर्यंत हे बागांमध्ये दिसून आले आहेत. 

शास्त्रज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा 

किड्यांचा प्रसार झाल्यास ते संपूर्ण शेतीचं नुकसान करू शकतात. एवढी त्यांची क्षमता आहे. संशोधकांचा दावा आहे की, जसजशी उष्णता वाढेल तसतसा या किड्यांचा त्रास वाढेल आणि एकाच वेळी हजारांच्या संख्येत बाहेर पडून संपूर्ण जमिनीवर हे किडे पसरतील. प्रोफेसर जीन-लू जस्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रजाती खूप धोकादायक आणि आक्रमक आहेत. या किड्यांची क्षमता इतकी आहे की, लवकरच सगळीकडे पसरून आपलं साम्राज्य जगभरात स्थापित करतील. त्यामुळे शास्त्रज्ञांनी सर्वांना सावधानतेचा इशारा दिला आहे की तुम्हाला हा कीडा दिसल्यास तिथल्या तिथे त्याला मारून टाका. कारण हे नवीन संकट आपल्यावर कोणती वेळ आणेल, याची शाश्वती नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: flatworm is new killer species heading in gardens and forms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.