पिङझा घेण्यासाठी रोखले उड्डाण

By admin | Published: July 10, 2014 02:21 AM2014-07-10T02:21:59+5:302014-07-10T02:21:59+5:30

फ्रंटियर एअरलाईन्सच्या वैमानिकाने डॉमिनो पिङझाच्या दुकानात फोन करून पिङझा मागवले आणि विमानातील भुकेल्या प्रवाशांसह सर्वाना खाऊ घातले.

Flight prevented from flying | पिङझा घेण्यासाठी रोखले उड्डाण

पिङझा घेण्यासाठी रोखले उड्डाण

Next
लॉस एंजिल्स : फ्रंटियर एअरलाईन्सच्या वैमानिकाने डॉमिनो पिङझाच्या दुकानात फोन करून पिङझा मागवले आणि विमानातील भुकेल्या प्रवाशांसह सर्वाना खाऊ घातले. या कार्यक्रमात विमान दोन तास उशिरा उडाले. 
त्याचे झाले असे, वॉशिंग्टनहून डेन्व्हरला चाललेल्या विमानात हे अभूतपूर्व नाटय़ घडले. खराब हवेमुळे विमानाच्या उड्डाणास आधीच उशिर झाला होता. त्यात विमानात कोणतेही खाद्यपदार्थ नव्हते. त्यामुळे हे विमान छेनी या छोटय़ा विमानतळावर उतरविण्यात आले. 
डेन्व्हरची हवा निवळण्याची वाट पाहत असताना विमानातील सर्वासाठी पिङझा मागविण्यात आले. 
विमानात 16क् प्रवासी व कर्मचारी होते. डाौमिनोचा व्यवस्थापक अँडी रिची याने सर्व पिङझा आणले व वैमानिकाकडे सुपूर्द केले. त्यानंतर विमानातील सर्वाना ते वाटण्यात आले. (वृत्तसंस्था)
 
पायलट म्हणाला, हवाई सेवा स्वस्त; मात्र मी उदार
च्वैमानिकाने यावेळी घोषणाही केली, बंधू आणि भगिनींनो फ्रंटियर एअरलाईन्स ही अमेरिकेतील सर्वात स्वस्त हवाईसेवा आहे; पण तुमचा कॅप्टन स्वस्त नाही तर तो उदार आहे. मी विमानातील सर्वासाठी पिङझा ऑर्डर केले आहेत. या पिङझाचे बिल क्रेडिट कार्डाद्वारे देण्यात आले; पण कार्ड कोणाचे होते हे मात्र माहीत नाही. 

 

Web Title: Flight prevented from flying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.