जगातील सर्वात मोठ्या 'एअरक्राफ्ट'चं उड्डाण

By admin | Published: March 21, 2016 09:12 PM2016-03-21T21:12:59+5:302016-03-21T21:51:40+5:30

जगातील सर्वात मोठं एअर क्राफ्ट 'एअर लॅण्डर-१०'च अनावरण करण्यात आलं. त्यानंतर 'एअर लॅण्डर-१०' ची पहिली टेस्ट यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे हे 'एअर लॅण्डर-१०'

The flight of the world's largest aircrafts | जगातील सर्वात मोठ्या 'एअरक्राफ्ट'चं उड्डाण

जगातील सर्वात मोठ्या 'एअरक्राफ्ट'चं उड्डाण

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २१ - जगातील सर्वात मोठं एअर क्राफ्ट 'एअर लॅण्डर-१०'च अनावरण करण्यात आलं. त्यानंतर 'एअर लॅण्डर-१०' ची पहिली टेस्ट घेण्यात आली. ती यशस्वीरित्या पार पडली.
विशेष म्हणजे  हे  'एअर लॅण्डर-१०' कुठेही ल्रॅण्ड होऊ शकते. म्हणजेच, डोंगरावर, मैदानामध्ये, बर्फावर किंवा पाण्यामध्ये लॅण्ड होवू शकते. 'एअर लॅण्डर-१०' या एअरक्राफ्ट निर्मिती युकेतील ब्रिटीश कंपनी हायब्रीड एअर व्हीकल्सने केली आहे.
दरम्यान, या 'एअर लॅण्डर-१०' ला  बनवणा-याने असा दावा केला आहे की, हे एक साउंड प्रूफ आणि इकोफ्रेंडली एअरक्राफ्ट आहे. त्याच्या बॉडी आणि टेक्सचर विषया सांगायलं झालं तर हे २६ मीटर ऊंच आणि ४४ मीटर रुंद आहे. त्याची लांबी ९२ मीटर आहे.  तर, एकावेळेस हे ४८ प्रवासी आणि ५० टन माल घेवून ९२ मैल प्रतितासाच्या वेगानं उडू शकतं. तसेच, या एअरक्राफ्टचा सैन्याच्या वापरासाठी, देखरेख किंवा संचार माध्यमासाठी उपयोग होऊ शकतो.
 
 
 
 
(सर्व फोटो - हायब्रीड एअर व्हीकल्सच्या संकेतस्थळावरुन घेण्यात आली आहेत.)

Web Title: The flight of the world's largest aircrafts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.