स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 01:57 PM2024-11-02T13:57:52+5:302024-11-02T13:58:45+5:30

पुरामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास 12 मृतांची नोंद झाली. आता मृतांचा आकडा 205 वर पोहोचला आहे. व्हॅलेन्सियामध्ये 202, कॅस्टिला-ला मांचामध्ये 2 आणि अंडालुसियामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

Flood in Spain 205 dead 1900 missing over 130000 homes without power; Prime Minister sent 2000 soldiers | स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक

स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक

स्पेनला महापुराच्या जबरदस्त फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका व्हॅलेन्सिया या शहराला बसला आहे. सीएनएच्या वृत्तानुसार, या आपत्तीत किमान 205 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक लोक व्हॅलेन्सिया शहरातील आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही भागांत रस्ते खचले आहेत. यामुळे आपत्कालीन सेवा पोहोचवणे अशक्य झाले आहे.

पुरामुळे 205 जणांचा मृत्यू - 
पुरामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास 12 मृतांची नोंद झाली. आता मृतांचा आकडा 205 वर पोहोचला आहे. व्हॅलेन्सियामध्ये 202, कॅस्टिला-ला मांचामध्ये 2 आणि अंडालुसियामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. व्हॅलेन्सियातील फेरिया एक्झिबिशन सेंटरचे रूपांतर तात्पुरत्या शवागारात करावे लागले आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत, यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

स्पॅनिश वृत्तपत्रांनुसार, 1900 लोक द्यापही बेपत्ता आहेत. प्रभावित भागातील प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे की, अनेक लोक आपल्या गाड्या वाचवण्यासाठी भूमिगत गॅरेजमध्ये गेले आणि पाण्यात अडकले. अशा अनेक वेदनादायक घटना प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. पुरामुळे 1,30,000 हून अधिक घरांची वीज गेली होती. आज शुक्रवारपर्यंत, 23000 घरांची वीज अद्यापही गूल होती.

कशामुळे आला पूर
देशाच्या पूर्वेकडील आणि दक्षिण-पूर्व भागात, जसे की व्हॅलेन्सिया, कॅस्टिला-ला मंचा आणि अँडालुसिया येथे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. सिन्हुआ न्यूज एजन्सीनुसार, या भागातील जमीन अतिवृष्टीचे पाणी शोषू शकली नाही. यामुळे मंगळवारी रात्री, मुसळधार पाऊस झाला आणि अचानक पूर आला. तसेच, जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) मते, हवामान बदलामुळे अतिपरिणामकारक पूर आणि दुष्काळाचे कारण बनणाऱ्या हवामानातील घटना अधिक संभाव्य आणि अधिक गंभीर झाल्या आहेत. आणि हे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून सिद्ध होत आहे. 

या पूरात, पुल, रेल्वेचे बोगदे, कार, वाहून गेले आहेत शेती पाण्याखाली गेली आहे. 100 वर रस्त्यांचे नुकसान झाले आहे. खेत पानी में डूब गए. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक घरांवर आणि कारच्या छतांवर चढून बसले. मात्र सर्वच लोक वाचू शकले नाही.

2,000 सैनिक, 400 वाहने 15 हेलिकॉप्टर्स मदतीसाठी - 
स्पेनेच पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी गुरुवारी प्रभावित भागाचा दौरा केला आणि सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय सरकारने तीन दिवसांचा शोकही घोषित केला हाहे. जवळपास 2,000 सैनिक, 400 वाहने आणि 15 हेलिकॉप्टर्स मदत आणि बचाव कार्यासाठी उतरवण्यात आले आहे.
 

Web Title: Flood in Spain 205 dead 1900 missing over 130000 homes without power; Prime Minister sent 2000 soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.