जपानमध्ये हाहाकार , सलग तीन दिवस मुसळधार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:46 AM2018-07-09T04:46:22+5:302018-07-09T04:47:16+5:30
जपानच्या दक्षिण भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.
हिरोशिमा - जपानच्या दक्षिण भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. पूर आणि अन्य घटनांमुळे बळी गेलेल्या नागरिकांची संख्या ४८ वर पोहोचली आहे आणि अन्य २८ जण मृत्युमुखी पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दर मिनिटाला वाढतेय संकट
पंतप्रधान शिंजो आबे यांनी या आपत्कालीन परिस्थितीचे वर्णन ‘वेळेसोबतचा संघर्ष’ असे केले आहे. कारण दर मिनिटाला समस्या वाढत आहेत. पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले आहे की, मदत कार्य, लोकांचा जीव वाचविणे आणि स्थलांतराचे काम ही एक लढाई आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही.
20लाख नागरिकांचे स्थलांतर
92नागरिकांचा अद्याप शोध सुरू
40 हेलिकॉप्टर मदतीसाठी
शेकडो घरे उद्ध्वस्त
पश्चिम जपानमध्ये परिस्थिती अधिक बिकट आहे. काही गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. काही लोकांनी आपल्या घरावरच आश्रय घेतला आहे. अचानक आलेल्या पुरामुळे भूस्खलनही
झाले आहे. कित्येक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.