महापुरामुळे किम जोंग उन भडकला, 30 अधिकाऱ्यांना फासावर लटकवले; 4000 लोकांचा मृत्यू कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:56 PM2024-09-04T14:56:56+5:302024-09-04T14:57:28+5:30

उत्तर कोरियामध्ये अतीवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच पुराच्या पाण्यात ४००० लोकांचा मृत्यू झाला आहे.

flood provokes Kim Jong Un, hangs 30 officials; Caused 4000 deaths north Korea | महापुरामुळे किम जोंग उन भडकला, 30 अधिकाऱ्यांना फासावर लटकवले; 4000 लोकांचा मृत्यू कारण

महापुरामुळे किम जोंग उन भडकला, 30 अधिकाऱ्यांना फासावर लटकवले; 4000 लोकांचा मृत्यू कारण

उत्तर कोरियाचा हुकुमशहा ऑलिम्पिक वीरांना दिलेल्या शिक्षेवरून चर्चेत असताना आता एकाचवेळी ३० अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा दिल्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. उत्तर कोरियामध्ये महापूर आला होता. या पुराच्या पाण्यात हजारो लोक मारले गेल्याने किंम जोंग उन भडकला आहे. यामुळे त्याने या अधिकाऱ्यांना थेट फासावरच लटकविण्याचा निर्णय घेतला आहे. 

उत्तर कोरियामध्ये अतीवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच पुराच्या पाण्यात ४००० लोकांचा मृत्यू झाला आहे. या लोकांना वाचविण्यात अपयशी ठरलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना किमने भयानक शिक्षा दिली आहे. ही शिक्षा देताना भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे खटले दाखल होते त्यांना किमने फासावर लटकविण्याचा निर्णय घेतला आहे. 

भीषण पुरामुळे चागांग प्रांतातील काही भाग उद्ध्वस्त झाला. यामध्ये 4,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हुकूमशहा किमने या पुरग्रस्त भागाता दौरा केला होता. तेव्हा तो अधिकाऱ्यांचे नियोजन पाहून भडकला होता. ज्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष केले त्यांना जबाबदार धरत तत्काळ फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार ऑगस्टमध्येच या अधिकाऱ्यांना एकाचवेळी फाशी देण्यात आली आहे. जुलै महिन्यात चागांग प्रांतात हा पूर आला होता. यात 15,000 हून अधिक लोक बेघर झाले होते. फाशी देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. किमने तेव्हा पक्षाच्या काही नेत्यांनाही बडतर्फ केले होते. यात 2019 पासून चांगांग प्रांताच्या प्रांतीय पक्ष समितीचे सचिव कांग बोंग-हून होते.

Web Title: flood provokes Kim Jong Un, hangs 30 officials; Caused 4000 deaths north Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.