फ्लोरिडामध्ये दोन वर्षाच्या मुलाने वडिलांवर 'झाडली' गोळी, कारण वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:06 PM2022-06-07T18:06:56+5:302022-06-07T18:07:58+5:30
Gun Culture America: रेगी मॅब्री (26) हा गेल्या महिन्यात व्हिडीओ गेम खेळत होता, तेव्हा त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ऑरेंज काउंटी शेरिफ ऑफिसनुसार, मॅब्रीचा परिवार मेट्रो ओरलॅंडोमध्ये राहतो आणि ज्यात तीन मुलं व पत्नी मेरी अयालाचा समावेश आहे.
Gun Culture America: एकीकडे अमेरिकेतील गन कल्चरवरून वाद पेटला आहे आणि दुसरीकडे फ्लोरिडामध्ये एका दोन वर्षाच्या मुलाने बंदूक हाती लागल्यावर चुकून वडिलांवर गोळी झाडली. ज्यात मुलाच्या वडिलाचं निधन झालं. आता या मुलाच्या आईला केसचा सामना करावा लागत आहे.
रेगी मॅब्री (26) हा गेल्या महिन्यात व्हिडीओ गेम खेळत होता, तेव्हा त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ऑरेंज काउंटी शेरिफ ऑफिसनुसार, मॅब्रीचा परिवार मेट्रो ओरलॅंडोमध्ये राहतो आणि ज्यात तीन मुलं व पत्नी मेरी अयालाचा समावेश आहे. ऑरेंज काउंटीचे शेरिफ जॉन मीना म्हणाले की, बंदूक व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांचा मुलगा बंदुकीसोबत खेळत होता आणि त्याने चुकून वडिलांवर गोळी झाडली'.
मीना म्हणाले की, 28 वर्षीय अयालावर बेजबाबदारमुळे हत्येचा लावण्यात आला आहे. अयाला आणि मॅब्री दोन्ही मुलांची उपेक्षा करणे आणि नशेच्या पदार्थांचं सेवन करण्याच्या आरोपात पेरोलवर होते. अधिकाऱ्यांनुसार, अयालाने सांगितलं की, तिच्या पाच वर्षाच्या मुलाने तिला सांगितलं की, तिच्या दोन वर्षाच्या मुलाने बंदूक चालवली होती. पण मोठा मुलगा हे नाही सांगू शकला की, त्याचा लहान भाऊ बंदुकीपर्यंत कसा पोहोचला.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या घटनेत मुलाला काही झालं नाही आणि त्यांना विभागाच्या देखरेखीत ठेवलं आहे. शेरिफ म्हणाले की, जर बंदूक सुरक्षित ठिकाणी ठेवली असती तर ही घटना रोखता आली असती. आता या लहान मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावलं आहे. आता एका लहान मुलाला हे ओझं घेऊन आयुष्यभर जगावं लागेल की, त्याने त्याच्या वडिलांवर गोळी झाडली.