Corona Florona Virus Entry: कोरोनानंतर आता फ्लोरोना! इस्त्रायलमध्ये सापडला जगातील पहिला रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:08 PM2021-12-31T19:08:10+5:302021-12-31T19:08:30+5:30

What is 'Florona' disease? इस्त्रायलमध्ये कोरोना लसीचे बुस्टर डोसही मोठ्या प्रमाणावर देण्यात आले आहेत. इस्त्रायलमध्ये नव्या व्हायरसचा जगातील पहिला रुग्ण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

florona virus disease first patient Found in Israel; Corona Influenza double infection reported in Israeli woman    | Corona Florona Virus Entry: कोरोनानंतर आता फ्लोरोना! इस्त्रायलमध्ये सापडला जगातील पहिला रुग्ण

Corona Florona Virus Entry: कोरोनानंतर आता फ्लोरोना! इस्त्रायलमध्ये सापडला जगातील पहिला रुग्ण

Next

तेल अवीव : एकीकडे जग कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसोबत लढण्याची तयारी करत आहे. कोरोनाच्या दोन लाटा भारतात, तीन जगभरात येऊन गेल्या आहेत. ओमायक्रॉनमुळे नवीन मोठी लाट येण्याची शक्यता असताना आता नव्या  व्हायरसने हजेरी लावली आहे. इस्त्रायलमध्ये नवा व्हायरस सापडल्याने कोरोनानंतर आता हा व्हायरस धडकी भरवतो का काय अशी शास्त्रज्ञांना शंका निर्माण झाली आहे. 

महत्वाचे म्हणजे इस्त्रायलमध्ये कोरोना लसीचे बुस्टर डोसही मोठ्या प्रमाणावर देण्यात आले आहेत. इस्त्रायलमध्ये नव्या व्हायरसचा जगातील पहिला रुग्ण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हायरसचे नाव फ्लोरोना ठेवण्यात आले असून कोरोना आणि इन्फ्लूएन्झाच्या दुहेरी संक्रमणाचा हा प्रकार असल्याचे इस्त्रायलचे वृत्तपत्र 'Yediot Ahronot' म्हटले आहे. या आठवड्यात रॅबिन मेडिकल सेंटरमध्ये मुलाला जन्म देणाऱ्या गर्भवती मातेला या फ्लोरोनाची लागण झाली आहे. 

इस्रायलचे आरोग्य मंत्रालय अजूनही या प्रकरणाचा अभ्यास सुरु असल्याचे म्हटले आहे. दोन विषाणूंच्या मिश्रणामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोग्य अधिकार्‍यांचा असा अंदाज आहे की 'फ्लोरोना' इतर रूग्णांमध्ये देखील असू शकतो, जो चाचण्यांअभावी समोर आला नाही. इस्रायल हा जगातील पहिला आणि सध्या एकमेव देश आहे जिथे कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन बूस्टर डोस दिले जात आहेत.

इस्रायलमध्ये कोरोना लसीचे चार डोस दिले जात आहेत. अलीकडेच, इस्रायलने लसीचा चौथा डोस देण्याची चाचणी सुरू केली. हा अशा प्रकारचा पहिला अभ्यास असल्याचे मानले जाते. राजधानी तेल अवीवच्या बाहेरील शिबा मेडिकल सेंटरमध्ये, ऑगस्टमध्ये बूस्टर (तिसरा) डोस मिळालेल्या 150 वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर चाचण्या सुरू झाल्या, त्यांना फायझर/बायोनटेक लसीचा चौथा डोस देण्यात आला.

तिसऱ्या डोसनंतर अँटीबॉडीची पातळी घटली
कर्मचार्‍यांना दिलेल्या अतिरिक्त डोसची चाचणी केली गेली आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडी पातळी कमी झाल्याचे आढळून आले. ही चाचणी अशा वेळी सुरू झाली आहे जेव्हा इस्रायली अधिकारी देशाच्या लोकसंख्येला दुसरा बूस्टर डोस देण्याचा विचार करत आहेत. कारण ओमिक्रॉनचे संक्रमण देशाबाहेर वाढत आहे. "चौथा डोस खरोखरच ओमिक्रॉनपासून संरक्षण प्रदान करतो आणि त्याची खूप गरज आहे, हे सिद्ध करू शकू" असे शिबा मेडिकल सेंटरमधील कार्डिओव्हस्कुलर ट्रान्सप्लांटेशन विभागाचे माजी संचालक प्रोफेसर जेकब लावे म्हणाले.

Web Title: florona virus disease first patient Found in Israel; Corona Influenza double infection reported in Israeli woman   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.