भारत-नेपाळचा सहकार्य वाढविण्यावर भर
By admin | Published: July 26, 2014 11:34 PM2014-07-26T23:34:01+5:302014-07-26T23:34:01+5:30
23 वर्षाच्या खंडानंतर शनिवारी झालेल्या आपल्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत भारत व नेपाळ यांनी द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेण्यावर भर दिला.
Next
काठमांडू : 23 वर्षाच्या खंडानंतर शनिवारी झालेल्या आपल्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत भारत व नेपाळ यांनी द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेण्यावर भर दिला. यात दोन्ही देशांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार व गुंतवणूक, जलसंसाधन आणि सीमा आदी मुद्यांबाबतच्या सहकार्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षत्व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि त्यांचे नेपाळी समपदस्थ महेंद्र बहादूर पांडे यांनी भूषविले. या बैठकीदरम्यान नवनव्या क्षेत्रंत सहकार्य वाढवून परस्पर संबंधांना नवी झळाळी देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. यासाठी नामवंत व्यक्तीचा एक गट स्थापन करण्यावरही यावेळी सहमती झाली.
बैठकीत मुख्यत: संरक्षण आणि सुरक्षिततेशी संबंधित मुद्यांवर भर देण्यात आला. दोन्ही देशांच्या सुरक्षेचा मुद्दा हा परस्परांशी निगडित असल्याची भावना उभय बाजूंनी व्यक्त केली. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह तथा अन्य अनेक मंत्रलयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
संयुक्त आयोगाच्या बैठकीपूर्वी स्वराज यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री पांडे यांच्याशी स्वतंत्रपणो बातचीत केली. परराष्ट्रमंत्री स्वराज या शुक्रवारपासून तीन दिवसीय नेपाळ दौ:यावर आहेत. भारतातील नव्या सरकारच्या प्राधान्य यादीत नेपाळ अग्रणी असल्याचे स्वराज यांनी दौ:याच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट केले.
पाच विविध गटांमध्ये संयुक्त आयोगाची बैठक पार पडली. यात राजनैतिक, सुरक्षा आणि सीमा यांच्याशी संबंधित एक गट, आर्थिक सहकार्य आणि पायाभूत सुविधांबाबत वेगळा गट, व्यापार आणि दळणवळण, ऊर्जा व जलसंसाधन, संस्कृती, शिक्षा आणि माध्यम क्षेत्रवरही स्वतंत्रपणो चर्चा झाली. राजनैतिक, सुरक्षा आणि सीमा या मुद्यावरील बैठकीचे नेतृत्व सुषमा स्वराज यांनी केले.
(वृत्तसंस्था)
4पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑगस्ट रोजी नेपाळच्या दौ:यावर जाणार असून नेपाळचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. या दौ:यात ते नेपाळी संसदेत भाषण करणार आहेत, तसेच पाचव्या शतकातील श्री पशुपतीनाथ मंदिराला भेट देऊन 4 ऑगस्टला ते पूजाही करणार आहेत.
41997 मध्ये इंद्रकुमार गुजराल यांच्यानंतर नेपाळला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील.