बॉरिस जॉनसन मालामाल; पंतप्रधानपद गेले, पण फक्त भाषणं ठोकून करतात लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 20:26 IST2022-12-15T19:07:12+5:302022-12-15T20:26:44+5:30
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन महिन्यातच जॉनसन यांनी दहा लाखांहून अधिकची कमाई केली आहे.

बॉरिस जॉनसन मालामाल; पंतप्रधानपद गेले, पण फक्त भाषणं ठोकून करतात लाखोंची कमाई
Boris Johnson: सप्टेंबर महिन्यात बॉरिस जॉनसन यांना ब्रिटनच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे लागले. पण, पंतप्रधानपद गेल्यावरही बॉरिस फक्त भाषणातून बक्कळ कमाई करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, फक्त भाषण देऊन बॉरिस यांनी 1 मिलीयन म्हणजेच सूमारे दहा लाख पाउंडपेक्षा अधिकची कमाई केली आहे. स्काय न्यूजच्या रिपोर्टनुसार, नोव्हेंबरमध्ये दिलेल्या भाषणातून बॉरिस यांनी 750,000 पाउंडपेक्षा अधिकची कमाई केली आहे.
भाषणांमधून 1,030,780 पाउंड कमवले
बॉरिस जॉनसन यांची भाषणे सेंटरव्ह्यू पार्टनर्स, एक बँकिंग फर्म, द हिंदुस्तान टाइम्स आणि सीएनएन ग्लोबल समिट लिस्बनसाठी होते. स्काय न्यूजच्या रिपोर्टनुसार, पायउतार झाल्यापासून गेल्या दोन महिन्यातच माजी पंतप्रधानांनी एकूण 1,030,780 पाउंड कमाई केली आहे.
9 नोव्हेंबरला न्यूयॉर्कमधील बँकिंग फर्म सेंटरव्ह्यू पार्टनर्सकडून भाषणासाठी त्यांना 277,723 पाउंड मिळाले. यानंतर 17 नोव्हेंबरला दिलेल्या भाषणासाठी द हिंदुस्तान टाइम्सकडून 261,652 पाउंड आणि 23 नोव्हेंबरला टेलीविसाओ इंडिपेंडेंटकडून सीएनएन ग्लोबल समिट लिस्बनमध्ये बोलण्यासाठी 215,275 पाउंड मिळाले.