विसर्जित पदार्थापासून अंतराळवीरांसाठी अन्न

By admin | Published: August 23, 2015 11:30 PM2015-08-23T23:30:32+5:302015-08-23T23:30:32+5:30

अंतराळवीरांची लघवी व उच्छ्वास यापासून खाद्यपदार्थ तयार करण्यावर संशोधन करण्यासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संस्थेने दक्षिण कॅरोलिनातील लेमसन

The food for the astronauts from the dissolved substance | विसर्जित पदार्थापासून अंतराळवीरांसाठी अन्न

विसर्जित पदार्थापासून अंतराळवीरांसाठी अन्न

Next

न्यूयॉर्क : अंतराळवीरांची लघवी व उच्छ्वास यापासून खाद्यपदार्थ तयार करण्यावर संशोधन करण्यासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संस्थेने दक्षिण कॅरोलिनातील लेमसन विद्यापीठास दरवर्षी २ लाख अमेरिकन डॉलरचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षे हे अनुदान दिले जाणार आहे.
अंतराळातील दीर्घकालीन प्रवासात अंतराळवीरांना तग कसा धरता येईल, यासाठी उत्सर्जित लघवी आणि उच्छ्वासापासून ताजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया विकसित करण्यासाठी नासाने विडा उचलत या विद्यापीठाला अनुदान जाहीर केले आहे. अंतराळवीरांना अंतराळ प्रवासात तंदुरुस्तीसह तग धरता यावा, यासाठी या विद्यापीठाचे संशोधक अंतराळवीरांची अन्नपदार्थाची गरज भागविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
विशिष्ट किण्व भाराच्या गुणसूत्रात बदल करून ३-डी प्रिटिंग किंवा ओमेगा-३-एससाठी पॉलिमर किंवा प्लास्टिक तयार करता येऊ शकते. ओमेगा-३ एसमुळे हृदयरोगाची जोखीम कमी होते. तसेच त्वचा आणि केसांचेही संरक्षण होते, असे प्रो. मार्क ब्लेनर यांनी सांगितले.
किण्वनासाठी नायट्रोजन (नत्र) लागते आणि मानवाच्या लघवीत भरपूर नायट्रोजन असते. चरबीयुक्त आम्लावर किण्वचे पोषण करता येते. हे किण्व उच्छ्वासातून (कॉर्बन) तयार करता येऊ शकते. चरबीयुक्त आम्ल आणि नत्राचे किण्वन करून त्याचे रूपांतर प्लास्टिक आणि ओमेगा-३-एसमध्ये केले जाईल, अशी ब्लनेर यांची प्रक्रिया आहे. नवनवीन संशोधनासाठी नासाने अमेरिकेतील ८ विद्यापीठांंना अनुदान दिले आहे. त्यापैकी क्लेमसन विद्यापीठ एक आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर महिनाभरापूर्वी मुक्कामास असलेल्या सहा अंतराळवीरांनी भाजीपाल्यापासून तयार केलेल्या अन्नावर भूक भागवून आवश्यक ऊर्जा मिळविली होती. २०३० पर्यंत मंगळावर मानव पाठविण्याचा नासाचा मनसुबा आहे. त्या दृष्टीने दीर्घकाळीन अंतराळ प्रवासात अंतराळवीरांना सर्व बाबतीत स्वावलंबी कसे करता येईल, यासाठी नासाने नवनवीन संशोधन हाती घेतले आहे.

Web Title: The food for the astronauts from the dissolved substance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.