चीनमध्ये आढळले 'डायनासॉर'च्या पायाचे ठसे

By admin | Published: March 12, 2017 05:55 PM2017-03-12T17:55:44+5:302017-03-12T18:12:02+5:30

चीनमधील जिलिन प्रांतात डायनासॉरच्या पायाचे ठसे सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

Footprints of 'Dinosaur' found in China | चीनमध्ये आढळले 'डायनासॉर'च्या पायाचे ठसे

चीनमध्ये आढळले 'डायनासॉर'च्या पायाचे ठसे

Next
ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 12 - चीनमधील जिलिन प्रांतात डायनासॉरच्या पायाचे ठसे सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. चीन,अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे.  ऑगस्ट 2015 मध्ये लॉंगजिंग शहरात एका गावातील डोंगराळ रस्त्यावर डायनासॉरच्या पायाचे ठसे आढळल्याचा दावा शास्त्रज्ञांनी  केला आहे. 
 
चायना युनिव्हर्सिटी ऑफ जियोसायन्सेसमध्ये प्राध्यापक असलेले शिंग लिडा यांनी 'हॅंडरोसॉर'चे 55 सेंटीमीटर लांब पायाचे ठसे आढळ्याचं सांगितलं.
 
 
 
याशिवाय मांसाहारी डायनासॉरच्याही पायाचे निशाणही आढळले आहेत. त्यांच्या पायाच्या ठशांची 43 ते 21 सेंटीमीटर इतकी आहे.
 
डायनासॉरच्या अखेरच्या कालावधीचा अभ्यास करण्यासाठी हे ठसे अत्यंत उपयोगी ठरतील अशी माहिती शिंग लिडा यांनी दिली.
 
 

 

Web Title: Footprints of 'Dinosaur' found in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.