पाकमध्ये प्रथमच हिंदू तरुणी बनली सहायक आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:09 AM2023-02-15T11:09:29+5:302023-02-15T11:09:53+5:30
सनाने २०२० मध्ये सीएसएस परीक्षा उत्तीर्ण केली.
लाहोर : पाकिस्तानमध्ये प्रथमच एका हिंदू तरुणीची केंद्रीय सर्वोच्च सेवा (सीएसएस) परीक्षा उत्तीर्ण होत सहायक आयुक्त पदावर नियुक्त झाली आहे. २७ वर्षीय सना रामचंद गुलवानी या तरुणीची पंजाब प्रांतात सहायक आयुक्त आणि प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सनाने २०२० मध्ये सीएसएस परीक्षा उत्तीर्ण केली.
सना ही व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर आहे. २०२० मध्ये सेंट्रल सुपिरियर सर्व्हिसेस (सीएसएस) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती पाकिस्तान प्रशासकीय सेवेत (पीएएस) सहभागी होणारी हिंदू समुदायातील पहिली तरुणी ठरली. पहिल्याच प्रयत्नात तिने परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २०१६ मध्ये तिने बेनझीर भुत्तो वैद्यकीय विद्यापीठातून एमबीबीएस पदवीसह युरोलॉजिस्ट म्हणून पदवी प्राप्त केली. त्यानंतरच तिने सीएसएस परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यात ती यशस्वी झाली.