उत्तर कोरियाच्या अणू चाचणी केंद्राला भेट देणार परदेशी पत्रकार, द. कोरियन पत्रकारांना नाकारली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 04:17 PM2018-05-22T16:17:53+5:302018-05-22T16:17:53+5:30
दक्षिण कोरियाच्या आठ पत्रकारांना मात्र तेथे जाण्यास परवानगी नाकारली आहे.
प्योंगयांग- उत्तर कोरियातील अणू चाचणी केंद्राला काही परदेशी पत्रकार भेट देण्यासाठी आले आहेत. अणू कार्यक्रम हळूहळू थांबवत असल्याच्या उत्तर कोरियाच्या घोषणेनंतर तेथिल सध्यस्थिती पाहाण्यासाठी हे पत्रकार पोहोचले होते. मात्र अमेरिकन लष्कराबरोबर सराव केल्यामुळे दक्षिण कोरियन पत्रकारांना तेथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली.
उत्तर कोरियन सरकारने मर्य़ादित स्वरुपात या अणुचाचणी स्थळाला भेट देण्याची परवानगी दिली आहे. भूमिगत चाचण्या आणि इंटरकॉन्टीनेन्टल बॅलिस्टीक मिसाइलच्या चाचण्या थांबवू असे आश्वासन उ. कोरियाने दिले होते. 12 जून रोजी किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. तत्पुर्वी उ. कोरियाने अणूकार्यक्रम थांबवत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते.
द. कोरियाने अमेरिकन लष्कराबरोबर युद्धसराव केल्यामुळे उत्तर कोरियाने नुकतेच प्रस्थापित झालेले उच्च स्तरिय संबंध गोठवले. त्यामुळे या पत्रकारांच्या चमूमध्ये द. कोरियन पत्रकारांचा समावेश नाकारण्यात आला. उ. कोरियात आलेल्या पत्रकार बीजिंगमधून एका चार्टर्ड विमानातून आले. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन, रशिया या देशांतील पत्रकारांमध्ये समावेश आहे. यामध्ये टीव्ही वाहिन्यांच्या पत्रकारांचाही समावेश आहे. हे पत्रकार उत्तर कोरियाच्या पूर्व किनारी प्रदेशात रेल्वेने जातील व ईशान्येस असणाऱ्या अणूचाचणी कार्यक्रम स्थळास भेट देतील.northeastern