इरमा वादळात फसलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालय सक्रीय! अमेरिका, फ्रान्सला तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 05:05 PM2017-09-09T17:05:37+5:302017-09-09T17:15:27+5:30
इरमा वादळाचा फटका बसलेल्या अनिवासी भारतीयांना आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्यासाठी पावले उचलली आहेत.
नवी दिल्ली, दि. 9 - इरमा वादळाचा फटका बसलेल्या अनिवासी भारतीयांना आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्यासाठी पावले उचलली असून, तिथल्या संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असे परराष्ट्र मंत्रालयाकडून शनिवारी सांगण्यात आले. अमेरिका, वेनेझुएला, फ्रान्स आणि नेदरलँड या चार देशांना इरमा वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. वादळाचा फटका बसलेल्या भारतीयांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी चारही देशातील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.
इरमा वादळामुळे वेनेझुएला, नेदरलँड, फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळामुळे ज्या भारतीयांना फटका बसला आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाचे अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत असे रवीश कुमार यांनी टि्वट करुन सांगितले.
कॅटगरी पाचमध्ये येणारे हे वादळ धडकले तेव्हा वा-याचा ताशी वेग 260 किलोमीटर होता. क्युबाला धडकल्यानंतर हे वादळ अमेरिकेच्या फ्लोरिडाकडे वळले. कॅरेबियन बेटावर 19 जणांचा मृत्यू झाला असून, हजारो घरांचे नुकसान झाले आहे. फ्रान्समध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, सात जण बेपत्ता आहेत. नेदरलँडच्या सेंट मार्टीन बेटावर दोघांचा मृत्यू झाला आहे.
Emergency Nos.
— Raveesh Kumar (@MEAIndia) September 9, 2017
(Depending on location)
Embassy of India, Venezuela
+58 4241951854/4142214721
Netherlands
+31247247247
France
0800000971