भारतात दिवाळी, तर चीनमध्ये मोठी आर्थिक उलथापालथ; शेअर बाजार धडाsssम!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 09:13 PM2022-10-25T21:13:42+5:302022-10-25T21:15:52+5:30

चिनी शेअर बाजारात (China Share Market) परदेशी गुतंवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे.

foreigners flee china stocks pull out a record fund panic spreads in market | भारतात दिवाळी, तर चीनमध्ये मोठी आर्थिक उलथापालथ; शेअर बाजार धडाsssम!

भारतात दिवाळी, तर चीनमध्ये मोठी आर्थिक उलथापालथ; शेअर बाजार धडाsssम!

googlenewsNext

चिनी शेअर बाजारात (China Share Market) परदेशी गुतंवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूक माघारी परतण्याची शक्यता आहे. चीनच्या सत्ताधारी पक्षाच्या अधिवेशनात सहाय्यक धोरणांमध्ये कपात आणि कोविडचे नवे निर्बंध यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढू लागली आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदार चिनी बाजारातून आपला निधी काढून घेण्याचे मन बनवत आहेत. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, सोमवारी विदेशी गुंतवणूकदारांकडून जबरदस्त विक्री झाली.

सोमवारी विक्रीचा सपाटा
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसात हाँगकाँगसोबतच्या व्यापार संबंधांद्वारे मेनलँड शेअर्समध्ये १७.९ अब्ज युरो (२.३ अब्ज डॉलर) विक्रमी विक्री झाली आहे. सध्या स्मॉल नेट आऊटफ्लो दिसून येत आहे. तज्ञांच्या मते, जर हा आऊटफ्लो वर्षाच्या शेवटपर्यंत चालू राहिला तर २०१४ मध्ये सुरू झालेला स्टॉक कनेक्ट कार्यक्रमाची ही पहिली वार्षिक घट असेल. 

मार्केटमध्ये दहशत
चीनमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पाच वर्षांच्या परिषदेनंतर सोमवारी बाजारात मोठ्या विक्रीची नोंद झाली. हँग सेंग चायना एंटरप्रायझेस इंडेक्स २००८ च्या आर्थिक संकटानंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर गेला. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सचे तज्ज्ञ मारविन चेन यांच्या दाव्यानुसार चिनी शेअर्सवर आता परदेशी सेंटीमेंट आता कमी दिसत आहे. कोविडच्या धोरणांमध्ये कोणताही बदल न होण्याची चिन्हे पक्षाच्या अधिवेशनातून समोर आली आहेत. बाजाराला आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय कार्य परिषदेची प्रतीक्षा करावी लागू शकते. यामध्ये नवे नेतृत्व चीनच्या आर्थिक समस्यांवर कसा आणि काय तोडगा काढणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

गुंतवणूकदार करताहेत एकाच गोष्टीची प्रतीक्षा
गुंतवणूकदारांच्या नजरा आता फक्त चीनचे नवे नेतृत्व पुढील तोटा टाळण्यासाठी आवश्यक चालना देऊ शकतील का याकडे आहेत. अलीकडेच, चीनने सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) आकडे उशीरा जाहीर केले होते. चीन १८ ऑक्टोबर रोजी जीडीपीचे आकडे जाहीर करणार होता. मात्र १७ ऑक्टोबरला याची शक्यता फेटाळून लावण्यात आली.

ब्लूमबर्गच्या सर्वेक्षणानुसार, एप्रिल-जून या कालावधीत जवळजवळ शून्य वाढीनंतर तिसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपी ३.३ टक्के वाढण्याची अपेक्षा अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हा विकास दर चीनसाठी अजूनही कमी असेल. हे आकडे चीनच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रभाव दर्शवतात.

Web Title: foreigners flee china stocks pull out a record fund panic spreads in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.