अमेरिकेच्या ओरेगॉनमधील जंगलांत आग, ५ लाख नागरिकांना हलविण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 12:10 AM2020-09-13T00:10:40+5:302020-09-13T00:11:52+5:30

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन संचालक अँड्र्यू फेल्प्स यांनी सांगितले की, आम्ही मृतदेहांचा शोध घेत आहोत. आगीत हजारो इमारती नष्ट झाल्या आहेत.

Forest fires in Oregon, USA, ready to evacuate 5 lakh citizens | अमेरिकेच्या ओरेगॉनमधील जंगलांत आग, ५ लाख नागरिकांना हलविण्याची तयारी

अमेरिकेच्या ओरेगॉनमधील जंगलांत आग, ५ लाख नागरिकांना हलविण्याची तयारी

Next

सलेम (अमेरिका) : अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यांतील जंगलांत दोन ठिकाणी मोठ्या आगी लागल्या आहेत. त्या नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रणा लढत असतानाच या राज्याच्या गव्हर्नरांनी सांगितले की, राज्याच्या इतर भागात कित्येक लोक बेपत्ता आहेत.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन संचालक अँड्र्यू फेल्प्स यांनी सांगितले की, आम्ही मृतदेहांचा शोध घेत आहोत. आगीत हजारो इमारती नष्ट झाल्या आहेत.
ओरेगॉनच्या गव्हर्नर केट ब्राऊन यांनी सांगितले की, राज्यातील ४0 हजार नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. ५ लाख लोकांना हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यापैकी काहींना घरे सोडण्यासही सांगण्यात आले आहे, तर काहींना घरे सोडण्याची तयारी ठेवा, असे सांगण्यात आहे.
ब्राऊन यांनी सांगितले की, जॅक्सन परगणा तसेच मॅरियन परगणा येथे आगीचा भीषण भडका उडाला आहे. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले की, दोन मोठ्या आगी पूर्वेला आणखी दूरवर पसरण्यापासून रोखण्यात यश आले आहे. हवामानातील बदल, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि हवेत अचानक वाढलेली आर्द्रता याचा अग्निशामक दलास फायदा झाला.

आग लावणाºया एकास अटक
अमेरिकेतील जंगलांत भडकलेल्या आगी नैसर्गिक आहेत की, मानवनिर्मित यावरून उलटसुलट चर्चा होत असतानाच दक्षिण ओरेगॉनमध्ये जंगलात आग लावून वणव्याची सुरुवात केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

कन्व्हेन्शन सेंटरमध्ये निवारागृह
स्थलांतरितांना आश्रय देण्यासाठी पोर्टलँडमधील ओरेगॉन कन्व्हेन्शन सेंटरचे रूपांतर निवारागृहात करण्यात येत आहे. आगीमुळे वातावरणात प्रचंड धूर साचला असून पोर्टलँडमधील हवेची गुणवत्ता प्रचंड घसरली आहे. पोर्टलँडच्या दक्षिण उपनगरातील महिला कारागृहातील १,३00 कैद्यांना अन्यत्र हलविण्यात आल्याचे ओरेगॉनच्या सुधारणा विभागाने म्हटले आहे.

Web Title: Forest fires in Oregon, USA, ready to evacuate 5 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.