मोबाइल फोन विसरा, येणार स्मार्ट चष्मा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 05:12 IST2025-01-16T05:09:25+5:302025-01-16T05:12:16+5:30
मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले की, मोबाइल तंत्रज्ञान हे आता जुने झाले आहे. पुढील काही वर्षांत मोबाइलची जागा स्मार्ट चष्मा घेणार आहे. मेटा आणि ॲपलसारख्या कंपन्या हे तंत्रज्ञान आणण्यात गुंतल्या आहेत.

मोबाइल फोन विसरा, येणार स्मार्ट चष्मा!
कॅलिफोर्निया : लोक मोबाइलशिवाय काही क्षणही राहू शकत नाहीत अशी आजची स्थिती आहे. फोन बंद झाला तर लोक अगदी बैचेन होतात. मात्र जर भविष्यात फोनच बंद झाला तर? हा विचारच आपण करू शकत नाही. पण हे शक्य होणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक जुन्या उपकरणाच्या जागी नवीन उपकरण येत आहे. असेच काहीसे स्मार्टफोनच्या बाबतीत होणार आहे.
मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले की, मोबाइल तंत्रज्ञान हे आता जुने झाले आहे. पुढील काही वर्षांत मोबाइलची जागा स्मार्ट चष्मा घेणार आहे. मेटा आणि ॲपलसारख्या कंपन्या हे तंत्रज्ञान आणण्यात गुंतल्या आहेत.
चष्म्यानेच होणार बहुतेक कामे
भविष्यात लोक मोबाइल फोन फक्त अगदी काही कामांसाठी वापरतील, असे झुकरबर्ग म्हणाले.
ते त्यांच्या चष्म्यानेच बहुतेक काम करतील. रे-बॅनसह मेटा असे चष्मे बनविण्यात व्यस्त आहे. सॅमसंग आणि गुगलसारख्या कंपन्यादेखील एआय फीचर्स असलेले स्मार्ट ग्लासेस लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
फक्त बोला अन्तुमच्या हातांना आराम द्या
स्मार्ट चष्मे प्रगत तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल वैशिष्ट्यांसह अनेक सुविधा प्रदान करतील. त्यांचा डिस्प्ले केवळ सूचनाच नाही तर नेव्हिगेशन आणि इतर माहितीदेखील दर्शवेल.
वापरकर्त्यांच्या हाताचा वापर न करता केवळ व्हॉइसद्वारे संदेश पाठवण्याची आणि कॉल करण्याची सुविधा तुम्हाला मिळेल. यामध्ये इनबिल्ट स्पीकर्स असतील, जे ऑडिओ सूचना देतील.
संवाद आणि कनेक्टिव्हिटीचा नवीन आयाम
मेटा यावर्षी रे-बॅनच्या मदतीने स्मार्ट चष्मा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये एक डिस्प्ले जोडला जाईल, जो यूजर्सना नोटिफिकेशन्स दाखवू शकेल. झुकेरबर्ग म्हणाले की, यामुळे डिजिटल गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल. हा संवाद आणि कनेक्टिव्हिटीचा नवा आयाम असेल.