सिक्युरिटी लॉकचा पासवर्ड विसरलात?
By Admin | Published: October 28, 2015 10:02 PM2015-10-28T22:02:23+5:302015-10-28T22:02:23+5:30
अँड्रॉईड उपकरणाचा पिन, पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात तरी आता काळजीचे कारण नाही. असे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत, त्याआधारे आपला फोन पुन्हा सुरू होऊ शकतो.
न्यूयॉर्क : अँड्रॉईड उपकरणाचा पिन, पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात तरी आता काळजीचे कारण नाही. असे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत, त्याआधारे आपला फोन पुन्हा सुरू होऊ शकतो.
नवीन अँड्रॉईड स्मार्टफोनशी संबंधित अँड्रॉईड उपकरण व्यवस्थापक नावाची एक सेवा असते. गुगल अकाऊंटमध्ये लॉग-इन असाल तर कोणत्याही उपकरणाद्वारे या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरवर लॉग-इन केल्यानंतर स्क्रीनवरील लॉक बटनवर क्लिक करून नवीन पासवर्ड द्यावा लागेल. जुन्या पासवर्डच्या जागी नवीन पासवर्ड आपल्या अकाऊंटच्या नावे होईल. सॅमसंगचा फोन वापरणाऱ्यांना फार्इंड माय मोबाईलची मदत घेता येईल. लॉक माय स्क्रीनवर क्लिक केल्यानंतर नवीन पिन टाकल्यानंतर लॉक करा. काही मिनिटात जुन्या पासवर्डऐवजी नवीन पिन काम करील.