गूगलचे माजी सीईओ आयफोनच्या प्रेमात

By admin | Published: March 13, 2016 06:26 AM2016-03-13T06:26:25+5:302016-03-13T06:26:25+5:30

गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी आणि अल्फाबेटचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष एरीक शिमिट यांना आयफोन वापरताना माध्यमांच्या छायाचित्रकारांनी टिपले आहे

Former Google CEO iPhone Love | गूगलचे माजी सीईओ आयफोनच्या प्रेमात

गूगलचे माजी सीईओ आयफोनच्या प्रेमात

Next

ऑनलाइन लोकमत
सेऊल, दि.१३ - गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी आणि अल्फाबेटचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष एरीक शिमिट यांना आयफोन वापरताना माध्यमांच्या छायाचित्रकारांनी टिपले आहे. शिमिट हे एप्रिल २०११ पर्यंत गूगलचे मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी होते.


या पूर्वी देखील त्यांना अँड्रॉईड फोन ऐवजी ब्लॅकबेरीचा फोन वापरताना टिपण्यात आले होते. शिमिट यांनी ब्लॅकबेरीचा की बोर्ड आवडत असल्याचे ही स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. शिमिट हे दक्षिण कोरियात झालेल्या गूगलच्या अल्फा गो एआय यंत्रणेच्या कार्यक्रमात आयफोनचा वापर करून छायाचित्रण करताना सेऊल येथील स्थानिक वृत्तपत्र ओसेनच्या छायाचित्रकारांनी टिपले आहेत.

Web Title: Former Google CEO iPhone Love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.