भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या माजी मंत्र्याला पोलीस धक्के मारत घेऊन गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 20:00 IST2023-12-27T19:58:53+5:302023-12-27T20:00:29+5:30
Shah Mahmood Qureshi: पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री सातत्याने भारताविरोधात बोलायचे.

भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या माजी मंत्र्याला पोलीस धक्के मारत घेऊन गेले
Shah Mahmood Qureshi Arrested By Police:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे. इम्रान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांना बुधवारी अडियाला तुरुंगाबाहेर अटक करण्यात आली.
Former Foreign Minister Shah Mehmood Qureshi being mistreated by police officers as he was stating his rights. This is absolutely shameful, disgusting conduct by those who get paid by us! pic.twitter.com/ZVNtnqN0jS
— PTI (@PTIofficial) December 27, 2023
गेल्या आठवड्यातच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सायफर प्रकरणात जामीन मंजूर केला होता. आता त्यांना पुन्हा एकदा अटक झाली आहे. ही अटक दुसऱ्या प्रकरण प्रकरणात झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, शाह महमूद कुरेशी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असताना सातत्याने भारताविरुद्ध गरळ ओकायचे.
पोलिसांनी धक्के मारत व्हॅनमध्ये बसवले
डॉनने दिलेल्या वृत्तानुसार आणि पीटीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, 67 वर्षीय शाह महमूद यांना पोलिसांनी धक्के मारत पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यांना अटक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी त्यांना धक्के मारत पोलीस व्हॅनमध्ये बसवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, सिफर प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर तात्काळ अदियाला तुरुंगाबाहेरुन पुन्हा अटक करण्यात आली.