Imran Khan Firing: मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी, रॅलीमध्ये घडला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:18 PM2022-11-03T17:18:09+5:302022-11-03T17:18:34+5:30
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
वजिराबाद-
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात माजी पंतप्रधान इम्रान खान देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पाकिस्तानच्या एआरवाय वृत्तसंस्थेनं दिली आहे. इम्रान खान यांच्यासोबतच आणखी चार व्यक्ती गोळीबारात जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
#UPDATE | Former Pakistan PM Imran Khan reportedly injured as shots fired near his long march container: Pakistan's ARY News reports pic.twitter.com/5QcgOtqpD9
— ANI (@ANI) November 3, 2022
पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून इम्रान खान यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांनी सध्या पाकिस्तानात 'आझादी मोर्चा' काढला आहे. सरकार विरोधी लढ्यात ते रस्त्यावर उतरले आहेत आणि निदर्शनं करत आहेत. ज्या दिवसापासून इम्रान खान तोशखाना प्रकरणात दोषी ठरवले गेले आहेत. तेव्हापासूनच त्यांनी आझादी मोर्चाला सुरुवात केली आहे. याच अंतर्गत गुरुवारी वजिराबाद येथे मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. यात स्वत: इम्रान खान देखील सहभागी झाले होते.
A firing was reported near the container of former PM and Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) chairman Imran Khan’s container near Zafar Ali Khan chowk in Wazirabad, Pakistan media reports. pic.twitter.com/mv5WvQIm7W
— ANI (@ANI) November 3, 2022
वजिराबाद येथे रॅली सुरू असतानाच गोळीबार झाला आहे. इम्रान खान यांच्या कंटेनरजवळ वजीराबाद येथील जफर अली खान चौकाजवळ गोळीबार झाल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. इम्रान खान यांच्यासोबतच माजी राज्यपाल इमरान इस्मेल देखील जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.