माजी पोप बेनेडिक्ट यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 06:40 AM2023-01-01T06:40:17+5:302023-01-01T06:40:38+5:30
‘वयोमानाशी संबंधित आजारांमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. शनिवारी सकाळी ९.३४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला,’ असे व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटेओ ब्रुनी यांनी सांगितले.
व्हॅटिकन सिटी : ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू राहिलेले माजी पोप एमेरिटस बेनेडिक्ट १६ वे यांचे शनिवारी येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. २ जानेवारीला त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ‘सेंट पीटर्स बॅसिलिका’ येथे ठेवण्यात येणार असून, गुरुवारी सकाळी ‘सेंट पीटर्स स्क्वेअर’ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘वयोमानाशी संबंधित आजारांमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. शनिवारी सकाळी ९.३४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला,’ असे व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटेओ ब्रुनी यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांनी माजी पोप बेनेडिक्ट यांची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याचे सांगत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.