Donald Trump in Porn Star Case : पॉर्न स्टार प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, न्यायालयाबाहेर जमले समर्थक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:12 AM2023-04-05T00:12:56+5:302023-04-05T00:15:55+5:30
डोनाल्ड ट्रम्प हे 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पॉर्न फिल्म अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्या प्रकरणी न्यायालयात हजर झाले आहेत.
न्यूयॉर्क - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात दाखल झाले. न्यायालयात पोहोचल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. डोनाल्ड ट्रम्प हे 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पॉर्न फिल्म अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्या प्रकरणी न्यायालयात हजर झाले आहेत. कोर्टात हजर राहण्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना एक ईमेलही पाठवला होता. या ईमेलच्या विषयात त्यांनी लिहिले की, "माझ्या अटकेपूर्वीचा माझा शेवटचा ईमेल. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे असे पहिलेच माजी राष्ट्रपती आहेत की, ज्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा आरोप आहे.
ट्रम्प पोहोचण्यापूर्वी न्यायालयाबाहेर आणि आतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ट्रम्प आठ गाड्यांच्या ताफ्यासह न्यायालयाच्या परिसरात पोहोचले. CNN च्या वृत्तानुसार, न्यायालयात हजर होण्यापूर्वी ट्रम्प मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात पोहोचले तेथे पोलिसांनी त्यांना अटक केली.
थोड्याच वेळात होणार सुवणीला सुरुवात -
अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलांनी त्यांना हातकडी न लावण्याची विनंती केली. या प्रकरकणावर आता काही वेळातच न्यायालयात सुनावणीही सुरू होणार आहे. ट्रम्प यांच्या टीमने 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतच्या अफेअरसंदर्भात मौन बाळण्यासाठी 1,30,000 डॉलर दिले होते. हे पेमेंट ट्रम्प यांचे वकील मायकेल कोहेन यांनी केले होते. मात्र जेव्हा ट्रम्प यांनी कोहेन यांना ही रक्कम परत केली, तेव्हा त्यांनी ही लिगल फीस असल्याचे म्हटले होते.
मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप -
या प्रकरणात ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर बिझनेस रेकॉर्ड्समध्ये खोटे बोलण्याचा आरोप लागला. जो न्यूयॉर्कच्या कायद्यानुसार, गुन्हा आहे. आरोप असाही आहे की, यामुळे निवडणूक कायद्याचेही उल्लंघन झाले आहे. कारण, कोहेन यांच्या माध्यमाने डॅनियल्सला पैसे देऊन, आपले कुठले अफेअर होते, हे त्यांना लोकांना कळू द्यायचे नव्हते