फोटो काढण्याचे 22 लाख, चहाचे 37 लाख; डोनाल्ड ट्रम्प 'अशी' करताहेत कोट्यवधींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:50 PM2022-02-16T17:50:54+5:302022-02-16T17:57:50+5:30
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प समर्थकांना फोटो काढण्यासाठी आणि एकत्र चहा घेण्यासाठी हजारो डॉलर्स खर्च करावे लागत आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. मात्र यावेळी ते त्यांच्या विधानामुळे नाही तर त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते सध्या वैयक्तिकरित्या लाखो डॉलर्स कमवत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प समर्थकांना फोटो काढण्यासाठी आणि एकत्र चहा घेण्यासाठी हजारो डॉलर्स खर्च करावे लागत आहेत.
रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चहा घेण्यासाठी 37 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर फोटो काढण्यासाठी 22 लाख रुपये लागतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आयोजित केलेल्या या निधी उभारणी कार्यक्रमातून मिळालेला पैसा थेट त्यांच्या खात्यात जातो. या कार्यक्रमांचा त्यांच्या रिपब्लिकन पक्षाशी काहीही संबंध नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रम्प यांनी कॉफी टेबल बुकमधून गेल्या एका वर्षात 506 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वैयक्तिक कार्यक्रमांतून पैसे कमावण्याच्या शर्यतीत फक्त ट्रम्पच नाहीत, तर इतर माजी राष्ट्राध्यक्षांनीही पैसा कमावला आहे. यामध्ये बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांचा समावेश आहे. बराक आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी 489 कोटी रुपयांमध्ये बुक डील केली होती. त्याच वेळी बिल आणि हिलरी क्लिंटन भाषणांमधून पैसे कमवतात. जॉर्ज बुश यांनाही त्यांच्या भाषणांचा पैसे कमवण्यासाठी चांगला उपयोग होतो.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कमाईचे एवढेच साधन आहे असे नाही. राष्ट्रपती होण्यापूर्वीच ते एक यशस्वी व्यापारी आणि खूप श्रीमंत व्यक्ती आहेत. मोहिमेतून मिळालेली रक्कम त्यांच्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईसमोर काहीच नाही. त्यांचे हॉटेल, रिअल इस्टेट, फायनान्स यासह अनेक व्यवसाय देश-विदेशात पसरलेले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.