‘एचआयव्ही’चे उगमस्थान सापडले?
By Admin | Published: October 4, 2014 02:11 AM2014-10-04T02:11:08+5:302014-10-04T02:11:08+5:30
एचआयव्ही विषाणूच्या उद्भवानंतर सुमारे 3क् वर्षानंतर प्रथमच त्याच्या उगमस्थानाचा शोध लागल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आतार्पयत जगभरातील सुमारे 75 दशलक्ष नागरिकांना एचआयव्हीची बाधा झाली आहे.
>लंडन : एचआयव्ही विषाणूच्या उद्भवानंतर सुमारे 3क् वर्षानंतर प्रथमच त्याच्या उगमस्थानाचा शोध लागल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आतार्पयत जगभरातील सुमारे 75 दशलक्ष नागरिकांना एचआयव्हीची बाधा झाली आहे.
हजारो विषाणूंच्या जैविक रचनेचे विश्लेषण केल्यानंतर शास्त्रज्ञ आफ्रिकेतील बेल्जियन कांगोची राजधानी असलेल्या किन्सहासा येथे एचआयव्हीचा सर्वप्रथम उगम झाला होता, या निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत. 192क् सालादरम्यान, मध्य आफ्रिकेत पसरलेल्या रेल्वे नेटवर्कचा एचआयव्हीच्या प्रसारास हातभार लागला.
संयुक्त राष्ट्र एड्स संस्थेच्या मते, 2क्13 अखेरीस जगभरात 35 दशलक्ष नागरिकांना एचआयव्हीची बाधा झाली होती.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका गटाने हा शोध लावला. एचआयव्ही-1 चा शोध लागून 3क् वर्षे झाल्यानंतरही त्याचे प्रारंभिक संक्रमण, प्रसार आणि त्याने समाजात कशी पाळेमुळे रोवली याचा अद्याप उलगडा झाला नाही. एचआयव्ही-1 च्या मध्य आफ्रिकेतील विविध नमुन्यांवरून 192क् पासून सध्याच्या कांगो देशातील किन्सहासा येथून त्याचा प्रसार होण्यास प्रारंभ झाला. दळणवळणाचे जाळे व सामाजिक बदल यांचा हात धरून एचआयव्हीचा प्रसार झाल्याचा निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाद्वारे मांडला आहे. (वृत्तसंस्था)