ज्वालामुखीच्या राखेमुळे चार विमानतळे बंद

By admin | Published: July 11, 2015 01:37 AM2015-07-11T01:37:53+5:302015-07-11T01:37:53+5:30

इंडोनेशियातील जावा प्रांताच्या पूर्व भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे चार विमानतळे बंद झाली आहेत

Four airport shutdowns due to volcanic ash | ज्वालामुखीच्या राखेमुळे चार विमानतळे बंद

ज्वालामुखीच्या राखेमुळे चार विमानतळे बंद

Next

जकार्ता : इंडोनेशियातील जावा प्रांताच्या पूर्व भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे चार विमानतळे बंद झाली आहेत. इंडोनेशियातील आघाडीची विमान कंपनी गरुडाने दिलेल्या माहितीनुसार बालीचा देनपासार आंतरराष्ट्रीय विमानतळ व लोम्बोक, जेम्बर, बानुयांगी ही चार विमानतळे बंद पडली आहेत. माऊंट राऊंग ज्वालामुखी उसळला असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडत आहे. बाली, लोम्बोक व बानुयांगी व जेम्बर ही चार विमानतळे सोडल्यास देशातील इतर विमानतळांवरून वाहतूक चालू आहे, असे गरुड हवाईसेवेने म्हटले आहे.
माऊंट राऊंग हा ज्वालामुखी इंडोनशियातील सर्वांत सक्रिय असून, जावा बेटावर असणाऱ्या या ज्वालामुखीचा उद्रेक २ जुलैपासून होत आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाला जाणारी विमाने रद्द करण्यात आली. बाली, लोम्बोक व बानुयांगी व जेम्बर या चार विमानतळांवरील वाहतूक बंद असून, पुढील सूचना मिळेपर्यंत ही चार विमानतळे बंद राहणार आहेत.

Web Title: Four airport shutdowns due to volcanic ash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.