चार भारतीय-अमेरिकनांचा निवडणुकीत विजय

By admin | Published: November 10, 2016 05:17 AM2016-11-10T05:17:43+5:302016-11-10T05:17:43+5:30

अमेरिकन काँग्रेसवर देशातील सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी म्हणता येतील असे चार भारतीय-अमेरिकन बुधवारी निवडून गेले व अभूतपूर्व अशी ‘देशी

Four Indian-American Elections | चार भारतीय-अमेरिकनांचा निवडणुकीत विजय

चार भारतीय-अमेरिकनांचा निवडणुकीत विजय

Next

वॉशिंग्टन : अमेरिकन काँग्रेसवर देशातील सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी म्हणता येतील असे चार भारतीय-अमेरिकन बुधवारी निवडून गेले व अभूतपूर्व अशी ‘देशी’
लाट निर्माण झाली. पाचव्या उमेदवाराच्या निवडणुकीचा निकाल फेरमतमोजणीमुळे जाहीर झालेला नाही.
भारतीय-अमेरिकन महिलांनी २०१६ च्या निवडणुकीत चांगली छाप पाडली. कमला हॅरीस (५१) यांनी कॅलिफोर्नियातून सिनेटवर निवडून जाऊन इतिहास घडवला. त्या दोन वेळा अ‍ॅटर्नी जनरल होत्या. प्रमिला जयापाल (५१) यांनी सिएटलमधून हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये प्रवेश केला. त्या सिएटलमधून निवडून जाणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला ठरल्या. इलिनॉइसमधून राजा कृष्णमूर्ती विजयी झाले. कॅलिफोर्नियातून रो खन्ना (४०) हे डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून निवडून गेले. डेमोक्रॅटिक पक्षाचे अ‍ॅमी बेरा यांच्या निवडणुकीचा निकाल फेरमतमोजणीमुळे जाहीर झालेला नाही. त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे स्कॉट जोन्स आहेत. बेरा निवडून आले तर तीन वेळा निवडून आलेले दलीप सिंग सौंद यांची ते बरोबरी करतील. सौंद हे कॅलिफोर्नियातून १९५७ ते १९६३ या कालावधीत हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हवर निवडून गेले होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हॅरीस आणि बेरा यांना पाठिंबा दिला होता. कमला हॅरीस यांचा जन्म ओकलँडचा (कॅलिफोर्निया). त्यांची आई १९६० मध्ये चेन्नईहून अमेरिकेत आली होती व कमला हॅरीस यांचे वडील जमैकन होते. जयापाल यांनी पहिल्याच निवडणुकीत अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा जन्म चेन्नईचा. वयाच्या पाचव्या वर्षी त्या भारतातून इंडोनेशिया, सिंगापुरातून अमेरिकेत आल्या. २५ वर्षांनंतर एप्रिल १९९५ मध्ये जयापाल या भारतात आल्या होत्या.
भारतात काही काळ घालवल्यानंतर माझ्या आयुष्यात चांगला बदल झाला, असे त्या म्हणाल्या. त्यांनी लिहिलेले ‘पिल्ग्रिमेज टू इंडिया ए वुमन रिव्हिजिटस हर होमलँड’ पुस्तक २००० मध्ये प्रकाशित झाले होते.
कृष्णमूर्ती यांचे आईवडील स्थलांतरित होते. कायद्याचे पदवीधर असलेले कृष्णमूर्ती ओबामा यांच्या यशस्वी ठरलेल्या सिनेट मोहिमेचे धोरण सल्लागार होते. न्यू जर्सी आणि मिशिगन येथून निवडणूक लढलेले दोन भारतीय अमेरिकन मात्र पराभूत झाले.


रो खन्ना यांना प्रायमरीजमध्ये आठ वेळा प्रतिनिधी राहिलेले होंडा यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. कॅलिफोर्नियाच्या निवडणूक पद्धतीत प्रायमरीजमध्ये पहिल्या दोन विजेत्यांना सार्वत्रिक निवडणुकीत ते एकाच पक्षाचे असतील तरी निवडणूक लढविण्याची मुभा आहे.

२०१४ मध्ये खन्ना होंडा यांच्याकडून फार थोड्या मतांनी पराभूत झाले होते. खन्ना हे येल विद्यापीठाचे कायद्याचे पदवीधर असून ओबामा प्रशासनात ते अधिकारी होते.

Web Title: Four Indian-American Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.