अमेरिकेत भारतीय कुटुंबातील चौघांची गोळ्या घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:44 AM2019-06-18T10:44:25+5:302019-06-18T10:44:43+5:30
अमेरिकेच्या आयोवा राज्यात भारतीय वंशाचे आयटी कर्मचारी व त्यांच्या पत्नी, दोन मुलांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
Next
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या आयोवा राज्यात भारतीय वंशाचे आयटी कर्मचारी व त्यांच्या पत्नी, दोन मुलांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
चंद्रशेखर सुंकारा (४४), त्यांच्या पत्नी लावण्या (४१), त्यांची १५ व १० वर्षांची दोन मुले यांचा मृतात समावेश आहे. चंद्रशेखर हे चंद्रा नावाने ओळखले जात होते. डिपार्टमेंट आॅफ पब्लिक सेफ्टीमध्ये ते आयटी कर्मचारी होते. त्यांच्या घरी पोलिसांनी सकाळी १० वाजता धाव घेतली तेव्हा या चार जणांचे मृतदेह घरात आढळून आले. त्यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसून आल्या.