गाझात अडकले चार भारतीय, त्यांची सुटका करणे मुश्किल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:50 AM2023-10-20T05:50:27+5:302023-10-20T05:50:44+5:30

परराष्ट्र खात्याची कबुली; इस्रायलमधून आतापर्यंत १२०० भारतीय मायदेशात

Four Indians stuck in Gaza, difficult to rescue israel hamas war | गाझात अडकले चार भारतीय, त्यांची सुटका करणे मुश्किल

गाझात अडकले चार भारतीय, त्यांची सुटका करणे मुश्किल

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गाझामध्ये चार भारतीय अडकले असून त्यांची तेथून सुटका करणे तितकेसे सोपे नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, गाझामधील स्थिती सुधारली की या चौघांना भारतात आणण्याची व्यवस्था केली जाईल. ऑपरेशन अजयच्या माध्यमातून इस्रायलमधून आतापर्यंत १२०० जणांना भारतात परत आणण्यात आले आहे. त्यात १८ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.

इस्रायलमध्ये अनेक भारतीय अडकले असून त्यांना आणण्यासाठी आणखी विमाने पाठविण्यात येणार आहे. इस्रायल व पॅलेस्टाइन या दोन्ही राष्ट्रांना भारताचा पाठिंबा आहे. २००० सालापासून ते आतापर्यंत भारताने पॅलेस्टाइनला विविध प्रकारे मदत केली, असेही ते म्हणाले.

‘सेफ झोन’वरही दिवसरात्र हल्ले
इस्रायलने गुरुवारीही गाझा पट्टी ओलांडून सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. हमासच्या विध्वंसक हल्ल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांपासून इस्रायली सैन्याकडून सतत हल्ले सुरू आहे.

महिला लीडर ठार
nगाझावरील हल्ल्यात हमासची एकमेव महिला लीडर जमिला अल-शांती मारली गेल्याचे संरक्षण दलाने म्हटले आहे. 
nती हमासचा सहसंस्थापक अब्देल अझीझ अल-रंतिसीची पत्नी होती. २०२१ पासून ती सक्रीय होती. 

गाझात दिवसातून एकदाच जेवण
इस्रायलने गाझाचा इंधन, पाणी, वीज तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गेल्या काही दिवसांपासून रोखला आहे. यामुळे अनेक नागरिक दिवसातून केवळ एकवेळ जेवण करत आहेत. पाणीच नसल्याने अतिशय अशुद्ध पाणीही ते पीत आहेत.

हमासला उत्तर कोरियाची शस्त्रे? 
nइस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हल्ला करण्याकरिता हमासच्या दहशतवाद्यांनी उत्तर कोरियाने निर्मिलेल्या शस्त्रांचा वापर केल्याचे म्हटले जात आहे.
nआम्ही कोणालाही शस्त्रे पुरविली नसल्याचे उत्तर कोरियाने स्पष्ट केले.  

Web Title: Four Indians stuck in Gaza, difficult to rescue israel hamas war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.