CoronaVirus : चार सिंहाना कोरोनाने गाठले; मोठ्या झूमध्ये खळबळ उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 03:52 PM2020-12-09T15:52:52+5:302020-12-09T15:53:50+5:30
CoronaVirus News: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सगळीकडे भीतीचे वातावरण असताना पाळीव प्राण्यांना, पक्षांना कोरोना झाल्यास काय, असा प्रश्न पडला होता. यावर अनेकदा संशोधन करून भीती नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता सिंहांना कोरोना झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
प्राण्यांपासून माणसाला झालेला कोरोना आता पुन्हा प्राण्यांमध्ये पसरू लागला आहे. स्पेनच्या बार्सिलोना शरहरातील एका प्राणी संग्रहालयात चार सिंह कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याशिवाय या प्राणी संग्रहालयातील दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सगळीकडे भीतीचे वातावरण असताना पाळीव प्राण्यांना, पक्षांना कोरोना झाल्यास काय, असा प्रश्न पडला होता. यावर अनेकदा संशोधन करून भीती नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता सिंहांना कोरोना झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जाला, नीमा आणि रन नावाच्या तीन सिंहीनींमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. तर कियुंबे नावाच्या सिंहामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. जेव्हा या चारही सिंहांची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. आता य़ा प्राणी संग्रहालयात कोरोनाचा शिरकाव कसा झाला याची चौकशी केली जात आहे. यानंतर या सिंहांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. पैकी दोन कर्मचारी कोरोना बाधित सापडले आहेत.
सिंहांची माणसाप्रमाणेच स्टँडर्ड पीसीआर स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. हे सिंह कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्या परंतू कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कोणत्यातरी कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने कोरोना झाला असावा, असे म्हटले जात आहे.
या प्राणी संग्रहालयाने म्हटल्यानुसार या सिंहाना अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग दिली जात आहेत. तसेच त्यांचे निरिक्षणही केले जात आहे. सौम्य लक्षणे असल्याने या सिंहांची सामान्य फ्ल्यू सारखीच देखभाल केली जात आहे. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत आहे.
या प्राणीसंग्रहालयात जे लोक येतात त्यांचे या सिंहांच्या संपर्कात येण्याची शक्यता तशी फार कमी आहे. कारण सिंह हा हिंस्त्र प्राणी आहे. यामुळे या लोकांना कोरोनाचे संक्रमन होण्याचा धोका खूप कमी आहे. तरीही काळजी घेतली जात आहे.
अमेरिकेशी संपर्कात
बार्सिलोनाचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात असलेल्या ब्रॉन्क्स झूमध्ये संपर्क साधला आहे. या प्राणीसंग्रहालयातील चार वाघ, आणि तीन सिंहांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. स्पेनआधी अमेरिकेत पहिला प्रकार समोर आला होता. या झू मधील सर्व वाघ आणि सिंह आता कोरोनातून बरे झाले आहेत. नाडिया नावाचा वाघ पहिल्यांदा कोरोनाबाधित झाला होता.