भारतात यशस्वीरीत्या हृदय शस्त्रक्रिया केलेल्या बाळाचा पाकमध्ये डिहायड्रेशननं मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 08:33 PM2017-08-08T20:33:46+5:302017-08-08T20:34:06+5:30

भारतात यशस्वीरीत्या हृदय शस्त्रक्रिया करून मायभूमीत परतलेल्या 4 महिन्यांच्या पाकिस्तानी बाळाचा डिहायड्रेशनमुळे मृत्यू झालाय.

Four Month Old Pakistani Boy Who Successfully Underwent Heart Surgery In India Dies Of Dehydration | भारतात यशस्वीरीत्या हृदय शस्त्रक्रिया केलेल्या बाळाचा पाकमध्ये डिहायड्रेशननं मृत्यू 

भारतात यशस्वीरीत्या हृदय शस्त्रक्रिया केलेल्या बाळाचा पाकमध्ये डिहायड्रेशननं मृत्यू 

Next

लाहोर, दि. 8 - भारतात यशस्वीरीत्या हृदय शस्त्रक्रिया करून मायभूमीत परतलेल्या 4 महिन्यांच्या पाकिस्तानी बाळाचा डिहायड्रेशनमुळे मृत्यू झालाय. त्या बाळाचं नाव रोहान सादिक असून, बाळाच्या मृत्यूची बातमी वडिलांनीच दिली आहे. 14 जून रोजी नवी दिल्लीतल्या नोएडामधील एका रुग्णालयात रोहानवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या बाळाला मेडिकल व्हिसा देण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

रोहान याच्या वडिलांनी बाळाच्या मृत्यूनंतर भारताचे आभार व्यक्त केले आहेत. लाहोरमध्ये वास्तव्याला असलेल्या कंवल सिद्दिकी यांचं चार महिन्यांचं बाळ जन्मानंतरच आजारी पडलं. डॉक्टरांनी त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचं सांगितलं. तसेच त्याच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं मतही व्यक्त केलं. त्यानंतर सिद्दिकी यांनी त्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली. जगभरातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात हृदय शस्त्रक्रिया फारच कमी खर्चात होते. त्याप्रमाणेच भारत आणि पाकिस्तानातील अंतरही फार कमी आहे. सिद्दिकी यांनी भारतीय उच्चायुक्तालयाकडे मेडिकल व्हिसाची मागणी केली होती. मात्र दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना व्हिसा मिळाला नव्हता. त्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून सिद्दिकी यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे अपील केलं.

ते म्हणाले, मॅडम, माझ्या मुलानं दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा बळी का ठरावं. तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि सरताज अजिज यांच्याकडेही व्हिसा मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेत रोहान आणि त्याच्या आईवडिलांना व्हिसा उपलब्ध करून दिला होता. व्हिसा मिळाल्यानंतर मुलाच्या वडिलांनी सुषमा स्वराज यांचे आभार मानले होते. 'इतके मतभेद असतानाही तुम्ही माणुसकी दाखवलीत हे पाहून चांगलं वाटलं. तुमच्या प्रयत्नांसाठी आभार. माणुसकी जिंकली आहे. देव सर्वांना सुखी ठेवो', असं ट्विट त्यांनी केलं होतं. जूनमध्ये रोहानला घेऊन कुटुंबीय नोएडात पोहोचले. नोएडातल्या एका रुग्णालयात रोहानवर 14 जून रोजी जवळपास 5 तास हृदय शस्त्रक्रिया सुरू होती. त्यावेळी डॉक्टरांना ती शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात यश आलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रोहानच्या पालकांनी सुषमा स्वराज यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. त्यानंतर ते पुन्हा पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात रोहानला अचानक पहिल्यांदा डायरिया आणि नंतर डिहायड्रेशन झालं. त्याला तात्काळ लाहोरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान रोहानचा मृत्यू झाला. रोहानच्या वडिलांनी ट्विट करत भावनांना वाट मोकळी करून दिलीय. ते म्हणाले, माझ्या रोहानची गेल्या रात्री जीवनयात्रा संपली. तो आता आणखी चांगल्या ठिकाणी पोहोचला आहे. भारताच्या लोकांनी त्याच्यासाठी जे प्रयत्न केले, त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.  

Web Title: Four Month Old Pakistani Boy Who Successfully Underwent Heart Surgery In India Dies Of Dehydration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.