फ्लोरिडात पादचारी पूल कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 07:27 AM2018-03-16T07:27:16+5:302018-03-16T07:27:16+5:30
फ्लोरिडा शहरात एका पादचारी पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी आहेत. फ्लोरिडातल्या मिमामीमध्ये नव्यानेच बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अमेरिका- फ्लोरिडा शहरात एक पादचारी पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी आहेत. फ्लोरिडातल्या मिमामी येथे नवीनच बांधण्यात आलेला हा पादचारी पूल कोसळला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिमामी विद्यापीठाजवळ असलेल्या हा पूल अचानक कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. पुलाच्या ढिगा-याखाली दबून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची सुरुवातीला भीती व्यक्त करण्यात येत होती. तसेच पूल कोसळल्यानं त्याच्या ढिगा-याखाली ब-याच गाड्या चिरडल्या गेल्या आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य राबवलं जात आहे.
my school finished putting up a bridge a few days ago and it literally just fell. my roommate and i heard it from our rooms and ran to the balcony pic.twitter.com/JOtoLuC3Qs
— 🖤 (@Ialilulelo) March 15, 2018
एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने हा पूल कोसळल्याची माहिती दिली आहे. तो म्हणाला, मी आणि माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या मित्राने पूल कोसळल्याचा आवाज ऐकला आणि आम्ही तातडीने बाल्कनीत आलो तेव्हा हे भयंकर दृश्य आम्हाला दिसले, काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळला. पूल कोसळल्यानं ढिगा-याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
#UPDATE "Several fatalities" in collapse of brand-new pedestrian bridge at Miami-area college, reports AP quoting Florida Highway Patrol
— ANI (@ANI) March 15, 2018