वॉशिग मशिनच्या वापरावरून झालेल्या वादात गेला चार जणांचा बळी
By admin | Published: January 2, 2016 02:40 PM2016-01-02T14:40:10+5:302016-01-02T14:40:10+5:30
वॉशिंग मशिनच्या वापरावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान चार जणांच्या हत्येत झाल्याची घटना अमेरिकेत घडली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लॉस एंजलिस (अमेरिका) दि. २ - वॉशिंग मशिनच्या वापरावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान चार जणांच्या हत्येत झाल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. मुलाच्या मैत्रिणीबरोबर त्याच्या वडिलांचा वॉशिंग मशिन वापरण्यावर वाद झाला. मद्यपी असलेल्या व वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांचा साठा असलेल्या वडिलांनी एक बंदूक घेतली गोळीबार केला ज्यात त्याच्या पत्नीसह तीन जण ठार झाले. मुलाने प्रसंगावधान साधत बंदुक घेतली व वडिलांना गोळ्या घातल्या ज्यात तेही ठार झाले.
पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. मुलगा मोरी याला पोलीसांनी अटक केली असून त्याला एक दशलक्ष डॉलर्स रकमेचा जामीन मिळाला आहे. मोरी व त्याची मैत्रिण आईवडिलांसोबत राहत होते. मोरीच्या आईला ह्रदयविकाराचा झटका आला असल्यामुळे तिची ते काळजी घेत होते. या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेल्या अन्य दोघांनीही हकनाक जीव गमावला आहे.