Video - तब्बल 9 महिन्यांचा लढा, एक आठवडा कोमात; 4 वर्षांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:49 PM2021-02-10T12:49:24+5:302021-02-10T12:55:15+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात केल्यानंतर तिला रुग्णालयातून हसत हसत निरोप देण्यात आला आहे.

four year old innocent girl won battle of corona after 9 months hospital gave great farewell video | Video - तब्बल 9 महिन्यांचा लढा, एक आठवडा कोमात; 4 वर्षांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

Video - तब्बल 9 महिन्यांचा लढा, एक आठवडा कोमात; 4 वर्षांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

Next

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून काहींनी यशस्वीरित्या कोरोनाावर मात केली आहे. कोरोनाची लढाई जिंकली आहे. याच दरम्यान एक दिलासादायक घटना समोर आली आहे. तब्बल 9 महिन्यांनी चार वर्षांच्या चिमुकलीने कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे. कोरोनावर मात केल्यानंतर तिला रुग्णालयातून हसत हसत निरोप देण्यात आला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

स्टेला मार्टिन (Stela Martin) असं या चिमुकलीचं नाव आहे. अस्थमाचा त्रास असलेल्या स्टेलाला काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला. काही काळ स्टेलाची परिस्थितीही अत्यंत गंभीर होती. तिची फुफ्फुस अतिशय क्षीण झाली होती. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने ती एक आठवडा कोमात होती. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान तिच्या वडिलांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र आता तब्बल नऊ महिन्यांनी तिने कोरोनावर मात केली असून एवढी मोठी लढाई जिंकली आहे.  

कोरोनातून बऱ्या झालेल्या चार वर्षांच्या स्टेलाला रुग्णालयामधून डिस्चार्ज देताना डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व कर्मचारी भावूक झाले. याचा काही सेकंदाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको हेल्थ सायन्सेस रुग्णालयाने (University Of New Mexico Health Sciences-UNMHSC) शेअर केलेल्या व्हिडीओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. टाळ्यांचा गजरात स्टेलाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! आणखी खतरनाक होतोय कोरोना?; नवा स्ट्रेन आढळल्याने चिंता वाढली; धडकी भरवणारी माहिती

कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्हायरसवर रिसर्च सुरू असून अनेक ठिकाणी संशोधकांना यश आले आहे. मात्र याच दरम्यान कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचाच संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच आता अर्जेंटिनामध्ये व्हायरसचा आणखी एक नवा स्ट्रेन आढळला आहे. रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने अर्जेंटिनामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याची माहिती दिली आहे. अर्जेंटिनाचे आरोग्य मंत्री जिनीज गार्सिया यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. या नव्या स्ट्रेनबाबत फारशी माहिती समोर आली नाही. गार्सिया यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तसेच आढळलेला पी1 आणि रिओ डि जनेरोमध्ये आढळलेला पी2 स्ट्रेनदेखील अर्जेंटिनामध्ये आढळले आहेत.

Web Title: four year old innocent girl won battle of corona after 9 months hospital gave great farewell video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.