फ्रान्समध्ये मविआसारखा प्रयोग, मुस्लिम विरोधी पक्षाला रोखण्यासाठी एकत्र आले विरोधक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 04:41 PM2024-07-09T16:41:33+5:302024-07-09T16:42:11+5:30

France Elections 2024: फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीची सध्या जगभरात चर्चा होत आहे. येथे विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या अँटी मुस्लिम पक्षाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी ऐनवेळी आघाडी केली आहे.

France Elections 2024: An experiment like MVAin France, the opposition came together to stop the anti-Muslim party | फ्रान्समध्ये मविआसारखा प्रयोग, मुस्लिम विरोधी पक्षाला रोखण्यासाठी एकत्र आले विरोधक

फ्रान्समध्ये मविआसारखा प्रयोग, मुस्लिम विरोधी पक्षाला रोखण्यासाठी एकत्र आले विरोधक

फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीची सध्या जगभरात चर्चा होत आहे. येथे विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या अँटी मुस्लिम पक्षाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी ऐनवेळी आघाडी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाला रोखण्यासाठी उदयास आलेली महाविकास आघाडी आणि उत्तर प्रदेशात बनलेली समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची इंडिया आघाडी यांनी लोकसभेत जसा चमत्कार घडवून दाखवला तसं चित्र फ्रान्समध्ये उभं राहिलं आहे.

सोमवारी फ्रान्समधील निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये विजयाचा दावेदार मानला जात असलेल्या नॅशनल रॅली या पक्षाला १४३ जागांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. आठवडाभरापूर्वीपर्यंत त्यांना ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र प्रत्यक्षात संसदेतील निकाल हे त्रिशंकू लागले. 

याबाबत झालं असं की, ३० जून रोजी फ्रान्समध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत नॅशनल रॅली पक्ष मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसत होता. अशा परिस्थितीत त्यांना मिळत असलेली आघाडी पाहून विरोधी पक्षांची गाळण उडाली होती. या पक्षांमध्ये राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या पक्षाचा आणि डाव्या पक्षांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीनंतर  डाव्या पक्षांनी सगळा विरोध विसरून एक नवं अँटी नॅशलन रॅली आघाडी बनवली. नंतर मॅक्राँ यांचे समर्थक आणि डाव्या पक्षांनीही आपापसातील मतभेद मिटवले आणि ते एकजूह होऊन मैदानात उतरले. दुसरीकडे कट्टरतावादी पक्षाला रोखण्यासाठी उदारमतवादी मतदार मोठ्या संख्येने मतदान देण्यासाठी उतरले. त्यानंतर एका आठवडाभरात संपूर्ण निवडणुकीचं चित्र बदललं. तसेच नॅशनल रॅलीविरोधात मतदारांचं ऐक्य झालं.

एकमेकांचे पारंपरिक विरोधक एकत्र आल्याने नॅशनल रॅलीविरोधात होणारं मतांचं विभाजन टळलं. तसेच नॅशनल रॅलीविरोधात मतांची एकजूट झाली आणि पक्षाला पराभव पत्करावा लागला. मात्र नॅशनल रॅली हा फ्रान्सच्या संसदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना १४३ जागा मिळाल्या. मात्र आघाड्यांचा विचार केला असता ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.  

अँटी मुस्लिम पक्ष नॅशनल रॅलीला रोखण्यासाठी डाव्या आणि मध्यममार्गी पक्षांनी न्यू पॉप्युलर फ्रंट उभी केली होती. त्यांना सर्वाधिक १८२ जागा मिळाल्या.  मॅक्राँ यांच्या एनसेंबल आघाडीला १६८ जागा मिळाल्या. ही आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. नॅशनल रॅली पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यांना १४३ जागा मिळाल्या. फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीमध्ये ५७७ जागा आहेत. तसेच बहुमतासाठी किमान २८९ जागांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत एनएफपी आणि एनसेंबल अलायन्स हे एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.   

Web Title: France Elections 2024: An experiment like MVAin France, the opposition came together to stop the anti-Muslim party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.