आईचं की वडिलांचं? आपल्या नावापुढे कोणाचं आडनाव लावायचं? 'या' देशातील मुलं स्वत:च ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 12:04 PM2021-12-21T12:04:16+5:302021-12-21T12:05:42+5:30

Surname News : नागरिकांना अगदी सोप्या पद्धतीने स्वतःचे आडनाव निवडण्याचा अधिकार दिला जाणार आहे.

france to make it easier for citizens to take mothers family name | आईचं की वडिलांचं? आपल्या नावापुढे कोणाचं आडनाव लावायचं? 'या' देशातील मुलं स्वत:च ठरवणार

आईचं की वडिलांचं? आपल्या नावापुढे कोणाचं आडनाव लावायचं? 'या' देशातील मुलं स्वत:च ठरवणार

Next

नावात काय आहे हे नेहमी म्हटलं जातं. पण नावामुळेच खरी ओळख मिळते. त्यामुळे जन्मानंतर नाव ठेवलं जातं. लग्नानंतर मुलीचं नाव आणि आडनाव (Surname) बदलण्याची प्रथा आहे. पण आता अनेक मुली लग्नानंतर आपलं आडनाव बदलत नसून आपलं आधीचंच नाव कायम ठेवत आहेत. बाळाचा जन्म झाला की वडिलांचं आडनाव लावलं जातं. पण आता आपल्या नावापुढे आईचं की वडिलांचं यापैकी कोणाचं आडनाव लावायचं हे मुलं ठरवणार आहेत. नावावरून तयार केलेल्या नव्या कायद्यामुळे हे शक्य होणार आहे. 

फ्रान्समध्ये (France) नागरिकांना अगदी सोप्या पद्धतीने स्वतःचे आडनाव निवडण्याचा अधिकार दिला जाणार आहे. फ्रान्समधील नव्या कायद्याने मुलांना आईचं आडनाव लावायचा हक्क दिला आहे. आपल्या आई-वडिलांपैकी कोणाचं आडनाव लावायचं, हे पूर्णपणे आता मुलांवर अवलंबून असणार आहे. फ्रान्सचे न्याय मंत्री एरिक डुपोंड-मोरेटी (Eric Dupond-Moretti) यांनी या संदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर ती आपलं आडनाव निवडू शकतात.

आता मुलं ठरवणार स्वत:चं आडनाव

फ्रान्समध्ये सत्तेत असलेल्या LREM पक्षाचे सदस्य पॅट्रीत विग्नल यांनी हा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार कायदेशीर वयोमर्यादा पूर्ण केल्यानंतर मुलांना आपलं आडनाव बदलण्याचे स्वातंत्र्य मिळेल. तसंच आपण आडनाव का बदलत आहोत, याचं कोणतेही कारण देण्याची गरज नसणार आहे. या प्रस्तावावर येत्या काही दिवसांत मतदान होणार आहे. बहुमत मिळाल्यास फ्रान्समधील कोणतीही व्यक्ती आपले आडनाव बदलू शकेल. वडिलांच्या वागणुकीमुळे असमाधानी असलेल्या मुलांना याचा जास्त फायदा होईल, ते आपल्या आईचे नाव वापरू शकतील.

नव्या कायद्यानुसार ही प्रक्रिया खूप सोपी होणार

फ्रान्समध्ये नागरिकांना आपलं आडनाव बदलण्याचं स्वातंत्र्य या आधीपासून आहेच मात्र, आडनाव बदलण्याची ही प्रकिया फारच किचकट आहे. आपण आडनाव का बदलत आहोत, याची वैध कारणं ही कायदा मंत्रालयाला द्यावी लागतात. पण आता नव्या कायद्यानुसार ही प्रक्रिया खूप सोपी होणार आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, एकल मातेने ज्या मुलांचं पालनपोषण केले आहे अशा मुलांना आपल्या आईचे नाव लावण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: france to make it easier for citizens to take mothers family name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.